मुंबई : देश आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला कोरोना व्हायरसकडून सातत्याने धक्के बसत असताना अमेरिकन रेटिंग एजन्सीनं भारतासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये भारत पुन्हा ९.५ टक्क्यांप्रमाणे जीडीपी गाठू शकतो, असा अंदाज फिच रेटिंग्जनं व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक रेटिंग एजन्सींनी या वर्षात म्हणजेच २०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी ५ ते ६ टक्के घसरण होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. फिच रेटिंग्जने सुद्धा या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत ५ टक्के घसरण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 


नेमका कसा वाढणार GDP? 


फिच रेटिंग्जने बुधवारी जाहीर केलेल्या एपीएसीच्या सार्वभौम पत अवलोकन म्हणजे सॉवरेन क्रेडिट ओव्हरव्यूमध्ये म्हटले आहे की, साथीच्या आजाराने भारताचा ग्रोथ अवलोकन वेगाने कमकुवत केला आहे आणि सार्वजनिक कर्जाच्या ओझ्यासारखे आव्हान उभे केले आहे. जागतिक संकटानंतर भारताची जीडीपी वाढ “बीबीबी” वर्गातील देशांकडे परत येऊ शकते. परंतु यापुढे भारताच्यावित्तीय क्षेत्रात महामारीमुळे आणखी नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली तरच पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ९.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.


 


काही दिवसांपूर्वी झालेली भारताच्या पतमानांकनात घट 


जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली होती.  भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे असं त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग बीएए ३ केली होती.