COVID-19 शी संबंधित सर्व निर्बंध `या` तारखेपासून संपुष्टात, मास्क घालणे बंधनकारक
Corona New guideline : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
नवी दिल्ली : Corona New guideline : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटविण्यात येणार आहे. असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Covid-19) हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण संख्या नोंदवली जात आहेत. यानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबत ही मोठी घोषणा
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या अधिकार्यांनी सांगितले की, 31 मार्चपासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध 31 मार्चपासून रद्द केले जात आहेत. तथापि, असे असूनही, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू राहतील. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या म्हणण्यानुसार, लागू नियमांची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत.
24 मार्च 2020 रोजी निर्बंध लागू
24 मार्च 2020 रोजी पहिल्यांदाच, केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, (DM कायदा) 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलही केले होते. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यानुसान हे निर्बंध हटविण्यात आले आहेत.