धर्मांतराचा खेळ: 24 वर्षीय मुन्नू यादव कसा बनला अब्दुल मन्नान?
मन्नू यादवच्या आईवडिलांना आपल्या मुलाला घरी परत आणायचे आहे
यूपी : धर्मांतरण टोळीने एका मुक बधिर मुलाचे ब्रेनवॉश केले आणि कुटूंब आणि धर्माविरूद्ध त्याच्या मनात विष पेरले. दिल्लीमधील मन्नू यादव नावाच्या एका मूक बधिर युवकाला अब्दुल मन्नान बनवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मन्नू यादवच्या आईवडिलांना आपल्या मुलाला घरी परत आणायचे आहे आणि त्याला पुन्हा हिंदूधर्म स्वीकारलेला पाहायचे आहे.
मन्नूच्या आई-वडिलांनीची माहिती
यूपी एटीएसच्या खुल्यासानंतर कुटुंबीयांनी झी न्यूजशी बोलताना या घटनेबद्दल सांगितले. कुटुंबाचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांचा मुलगा 2017 मध्ये दहावीत शिकत होता. त्यावेळी तो त्याच्या मित्रासोबत निजामुद्दीनच्या मरकजला गेला होता. कुटुंबाला हे कळले तेव्हा, कुटुंबीयांनी त्याला अशा ठिकाणी जाण्यास मनाई केली. त्यानंतर त्याने ते मान्य केले होते.
सन 2020 मध्ये मन्नू त्याचे मित्र गगन शकील आणि वसीम खान यांच्यामुळे धर्मांतर टोळीच्या संपर्कात आला. त्यानंतर एक दिवस शकीलने मुन्नूला पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि टोपी घातली. या कपड्य़ांवर त्यांनी मन्नूचा फोटोही काढला आणि तो त्याच्या कुटुंबियांना पाठवला.
सुरुवातीला मन्नू कोणालाही संशय येऊ नये म्हणून कपाळावर टिळा आणि पूजा करून घराबाहेर पडायचा. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कुटुंबाला समजले की, मन्नूचे धर्मांतर झाले आहे. मन्नूचे धर्मांतरण प्रमाणपत्र कुटूंबाकडे सोपवण्यात आले होते. ज्यात मन्नू यादवचे नाव अब्दुल मन्नान झाले होते.
वागण्यात बदल
धर्मांतरानंतर केल्यानंतर मुन्नूच्या वागण्यात आणि स्वभावात बदल झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने घरी नमाजही पडण्यास सुरवात केली. तो मुस्लिमांसारखे कपडे घालू लागला. जेव्हा कुटुंबीयांनी त्याचा विरोध केला तेव्हा त्याने खाणेपिणे बंद केले. इतकेच नाही तर, त्याने हात कापण्याची धमकीही दिली.
बर्याच मुलांचे धर्मांतर
या कुटुंबाचे म्हणणे आहे की, मुन्नू बरोबरच बर्याच मुलांचेही धर्मांतर करण्यात आले आहे. यासाठी तरुणांना चांगली नोकरी, परदेशात पाठवणे आणि जमीन देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. परंतु कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असे सांगितले गेले होते की, मन्नूने कोणत्याही दबावात न येता स्वत: च्या इच्छेने धर्म परिवर्तन केले आहे.
तर मुन्नूचे कुटुंबिय याच्या पूर्णपणे विरोधात आहेत. बऱ्याच लोकांचं धर्मांतर केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. ही धर्मांतर टोळी दुर्बल, गरीब आणि मुक बधिर मुलांना टार्गेट करुन धर्म परिवर्तन करतात. हे एक मोठे जाळे आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका आहे. आपल्या मुलाने घरी येऊन पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा अशी त्यांची इच्छा आहे.