नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. यासंदर्भात केंद्राने एक मोठा निर्णय घेतला असून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा करण्यात आलीय. कंपन्यांनी या किंमतीत 70 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यापूर्वी वाढती मागणी लक्षात घेता रेमेडीसीवीर औषधाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

रेमेडीसीवीर औषध हे Gilead Sciences ने इबोला विषाणूचा उपचार म्हणून विकसित केले होते. परंतु आता त्याचा उपयोग कोरोनाच्या उपचारासाठी केला जातोय. संशोधन अहवालात असं म्हटलंय की, कोरोना विषाणूची बनवणाऱ्या एंजाइमला हे ब्लॉक करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा म्हणाले की, रेमेडसवीरचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे. गेल्या पाच दिवसांत सहा लाख 69 हजार रेमेडीसीवर वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रेमडेसीवीरचे उत्पादन 28 लाख शीशी प्रतिमहिना वाढवून 41 लाख प्रति महिना इतकी करण्यात आलीय असेही त्यांनी सांगितले. 



केडीला हेल्थकेअरचे REMDAC याआधी 2800 रुपयांना मिळत होते. आता याची किंमत 899 रुपये आहे.  सिनजिन इंटरनॅशनलच्या RemWin ब्रॅंडची किंमत 3950 रुपये होती. जी आता 2450 रुपये आहे. डॉ रेड्डीजच्या REDYX ब्रॅंडची किंमत 5400 रुपये होती. ही किंमत आता 2700 रुपये आहे. सिप्ला औषध कंपनीच्या CIPREMI ब्रॅण्डची किंमत आधी 4000 रुपये होती. जी आता 3000 रुपये आहे. 

 

मायलन फार्मा औषध कंपनी DESREM ची किंमत आधी 4800 रुपये होती. ती आता 3400 रुपयांत मिळते. जुबिलेंटच्या JUBRI ब्रॅण्डची किंमत 4700रुपये होती. जी आता 3400 रुपये आहे. हेट्रो हेल्थकेयर या औषध कंपनीच्या COVIFOR ब्रॅण्डची किंमत आधी 5400 रुपये होती. जी आता 3490 रुपये आहे.

 

कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये डॉक्टरांनी रॅमेडीसीवीरचा वापर टाळावा असे 20 नोव्हेंबर, 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. या औषधाने रुग्णांची स्थिती बरी झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे संघटनेने म्हटलंय. 

 

रेमेडीसीवीरमुळे मृत्यु दर कमी होतोय किंवा व्हेंटीलेटरची आवश्यकता कमी असल्याचे पुरावे सापडले नसल्याचेही त्यांनी पुढे म्हटले. दरम्यान हा दावा खरा नसल्याचे सांगत रेमेडीसीवीर कोरोना उपचारासाठी प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटलंय.

येथे तक्रार करा


जर एखाद्याला औषधासंदर्भात तक्रार असेल तर तो टोल फ्री क्रमांक - 1800 111 255 वर कॉल करू शकता. याशिवाय monitoring-nppa@gov.in वर ईमेल करू शकता.