...हेच असेल जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचं एकमेव उत्तर - भाजप
जम्मू - काश्मीरच्या स्वायत्ततेच्या अतिशय संवेदनशील विषयावर भाजपनं आपलं मत मांडलंय.
जम्मू : जम्मू - काश्मीरच्या स्वायत्ततेच्या अतिशय संवेदनशील विषयावर भाजपनं आपलं मत मांडलंय.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० हटवणं हाच काश्मीरच्या गेल्या कित्येक दशकांपासूनच्या समस्येचा व्यावहारिक उपाय असू शकतो, असं भाजपनं म्हटलंय.
भाजपचे प्रवक्ते वीरेंद्र गुप्ता यांनी, जम्मू-काश्मीरला अन्य राज्यांच्या बरोबरीनं आणण्यासाठी कलम ३७० हटवणं हा एकच पर्याय असू शकतो, असं म्हटलंय. दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या फुटीरतावद्यांना आणि पाकिस्तानसाठी हेच सडेतोड प्रत्यूत्तर असेल... तसंच हाच जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग असेल असंही गुप्ता यांनी म्हटलंय.
जम्मू-काश्मीरसोबत वेगळा व्यवहार करणं, राज्याला वेगळं संविधान बनवण्याची परवानगी देणं आणि भारतीय संविधानत कलम ३७० लागू करणं हेच जम्मू-काश्मीरच्या सध्याच्या समस्येचं मूळ कारणं आहे, असंही गुप्ता यांनी म्हटलंय.