नवी दिल्ली : ताजमहालावरून वाद पेटलेला असतानाच आता दिल्लीतल्या हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग माजण्याची चिन्हं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कबर ऐतिहासिक वारसाच्या यादीतून काढून टाकावी आणि त्या जागी मुस्लिमांसाठी कब्रस्तान करावं, अशी मागणी उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डानं केलीय.


वक्फ बोर्डाचं अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्रही पाठवलंय. 


दिल्लीमध्ये मुस्लिमांच्या दफनभूमीसाठी जागा कमी पडत असताना या कबरीचा दर्जा काढल्यास ही जागा वापरता येईल, अशी वक्फ बोर्डाची भूमिका आहे. मात्र मुस्लिम धर्मगुरूंनी या मागणीला विरोध केलाय.