Republic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.
Republic Day : उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारत आपला 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) साजरा करणार आहे. भारतीय लोकशाहीची (Democracy) मुल्य कायम टिकून रहावी, यासाठी प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा केला जातो. हा दिन साजरा करताना ध्वजारोहण (Flag Hoisting) आणि ध्वज फडकवणे (Flag Unfurling) यातील फरक जाणून घेणं गरजेचं आहे. (Republic Day 2023 What is the difference between flag hoisting and Flag Unfurling marathi news)
ध्वजारोहण म्हणजे काय? (Flag Hoisting)
15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेलं जातं आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो. 15 ऑगस्टच्या दिवशी ब्रिटिशांचा 'युनियन जॅक' खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढविला गेला होता. म्हणून याला 'ध्वजारोहण' ज्याला इंग्रजीमध्ये 'Flag Hoisting' म्हणतात.
ध्वज फडकावणे म्हणजे काय? (Flag Unfurling)
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज (Indian Flag Tiranga) हा अगोदरच वर बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला ध्वज फडकावणे म्हणतात. इंग्रजीत त्याला Flag Unfurling असं म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान (Indian Constitution) लागू झालं होतं म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात.
आणखी वाचा - Republic Day : दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, राज्यात अलर्ट
दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्वजारोहण होतो. तर 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर (Rajpath) झेंडा फडकवला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.