नवी दिल्ली : 69 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजपथावर या निमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी भारताला अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी सादर करण्यात आल्या. महाराष्ट्राचा चित्ररथ देखील राजपथावर सहभागी होता. तसेच महिला जवानांनी राजपथावर बाईक प्रात्यक्षिक दाखवली. त्याचप्रमाणे हवाई दलाने आपले वेगवेगळे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी चूक केली. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा प्रोटोकॉल तोडला आहे. पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल तोडत सामान्य जनतेत पोहोचले. शुक्रवारी राजपथावर प्रजासत्ताक दिनावर परेड संपल्यानंतर मोदी सामान्य लोकांना भेटण्यासाठी गेले. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि 10 नेत्यांच्या जाण्यानंतर लगेचच मोदींनी सामान्यांना भेट दिली. 



मोदींनी यावेळी जॅकेटसोबत चुडीदार - कुर्ता आणि पारंपरिक पगडी घातली होती. यावेळी सामान्यांनी देखील मोदींना भेटण्यासाठी गर्दी केली होती.