मुंबई : उद्या भारताचा 69 वा प्रजासत्तक दिन साजरा होणार आहे. यानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर रंगारंग कार्यक्रम आणि शिस्तीचं दर्शन देणारी परेड  पाहण्यासारखी असते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला एक खास आकर्षण आहे.  


काय आहे खास गोष्ट ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा 10 आशियाई देशांचे प्रमुख सहभाग घेणार आहेत. पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या आमंत्रणाचा स्वीकार करून अनेक हे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये दाखल झाले आहेत. 


इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात आमंत्रित केलेल्यांमध्ये व्यक्तींपेक्षा त्यांच्या क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे. 
10 राष्ट्रध्यक्षांचा हा दौरा अनेक कारणांसाठी खास ठरणार आहे. 


कोणाकोणाचा असणार सहभाग ? 


प्रजासत्तक दिनाच्या सोहळ्यासाठी थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया,मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे. 


प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रंगण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक शिखर बैठक घेणार आहे. 


नऊ राष्ट्राध्यक्षांचा समावेश झाला आहे तर आज इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो भारतामध्ये येणार आहेत.