Home Loan EMI : रिझर्व बँकेने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. चार आठवड्यांमध्ये रेपो रेट (Repo Rate Hike) हा 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI बँकांना ज्या दराने (Home Loan Interest Rate) कर्ज देतं तो दर म्हणजे रेपो रेट. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेपो रेट वाढीमुळे तुम्ही जर 20 वर्षांसाठी कर्ज घेतलं असेल तर आता 24 वर्षे कर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. बँका देत असलेली कर्ज बाह्य बेंचमार्कशी जोडलेली असतात. ते रेपो दराशी जोडलेले असते. यामुळेच रेपो दरात कोणताही बदल केल्यास गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो. 


रेपो दरात वाढ झाल्याने तुमच्या गृहकर्जाचा हप्ता वाढतो. तसेच, MCLR, बेस रेट आणि BPLR शी जोडलेल्या जुन्या गृहकर्जांवरही त्याचा परिणाम होईल. मे महिन्यापासून रेपो दरात 190 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. जेव्हा कर्जाचे दर वाढतात तेव्हा बँका कर्जाचा कालावधी वाढवतात. 


जर एखाद्याने एप्रिल 2019 मध्ये 6.7% दराने 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल, तर एप्रिल 2022 पर्यंत त्याने 36 हप्ते जमा केले असतील. म्हणजेच, त्याच्या कर्जाचा कालावधी केवळ 17 वर्षांचा होता आणि कर्जाची थकबाकी 46.04 लाख रुपये होती. परंतु 8.6 टक्के दराने त्याला 22 वर्षे 10 महिन्यांसाठी अधिक हप्ते भरावे लागतील. म्हणजेच त्याच्या हप्त्यांची संख्या 60 ने वाढली आणि ते कर्ज पाच वर्षे भरावं लागतं.