१५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होणार का? पाहा रेल्वे मंत्रालयाने काय दिलं उत्तर
रेल्वे सेवा कधी सुरु होणार?
मुंबई : रेल्वेने शनिवारी १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे, असा अनेक बातम्या व्हायरल होत होत्या. पण रेल्वेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. १५ एप्रिलपासून देशात रेल्वे सेवा पुन्हा सुरु होईल अशा चर्चा सुरु होत्या, पण रेल्वे मंत्रालयाने यावर स्पष्ट नकार दिला आहे.
एका अधिकाऱ्याने शनिवारी म्हटलं की, "रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर ट्रेन सेवा सुरु केल्या जातील."
रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फ्ररेंसिंग बैठकीत म्हटलं की, सरकारकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतरच रेल्वे सेवा सुरु होईल. सरकारने याबाबत काही मंत्र्यांची समिती बनवली आहे.
पंतप्रधानृ नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आली. रेल्वेने २१ दिवसांसाठी १३,५२३ ट्रेन रद्द केल्या होत्या. फक्त मालगाडी सुरु आहेत.