देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातल्या मुलांनी कोणत्या शाळेत घेतलं शिक्षण, किती रुपये भरली फी?
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आणि या कुटुंबातील मुलांनी कुठे घेतलंय शिक्षण, किती भारलीये फी? जाणून घेऊयात
Top Industrialists of India: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबीयांबाबत सर्वसामान्य नागरिकांना कायम आकर्षण असतं. या कुटुंबियातील मुलांची जडणघडण काही झाली असेल, ही मुलं जेवत काय असतील? कशी राहत असतील याबाबत आपल्याला कायम उत्सुकता असते. आज या बातमीतून तुम्हला सांगणार आहोत देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील मुलांनी कोणत्या शाळांमध्ये घेतलंय शिक्षण आणि त्यांनी शाळेची किती रुपये भरली फी.
आधी जाणून घेणार आहोत अंबानी कुटुंबीयांबाबत. अंबानी कुटुंबातील आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि इशा अंबानी यांच्याबाबतही आपल्याला कायम उत्सुकता असते.
आकाश अंबानी :
मुकेश अंबानी यांचे थोरले पुत्र आकाश अंबानी यांनी त्यांची स्वतःचीच शाळा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. मीडिया रिपोर्टप्रमाणे या शाळेची केजी ते 7 वी पर्यंतची फी तब्बल 1 लाख 70 हजार एवढी आहे. त्यानंतर आकाश यांनी अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ब्राऊन युनिव्हर्सिटीची वार्षिक फी तब्बल 50 ते 55 लाख असल्याचं समजतं. विषयानुरूप ही फी कमीअधिक होत असते.
ईशा अंबानी
आकाश अंबानींची जुळी बहीण ईशा अंबानीनेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून आपलं शिक्षण पूर्ण केल्याचं समजतं. यानंतर ईशाने Yale युनिव्हर्सिटीमधून सायकॉलॉजि आणि पुढे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून MBA पदवी घेतली आहे. Yale युनिव्हर्सिटीची सायकॉलॉजिची फी वार्षिक 50 लाख रुपये आहे. तर Stanford युनिव्हर्सिटीची MBA ची फी वार्षिक 62 लाख रुपये आहे.
अनंत अंबानी
मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांनीही स्वतःच शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून पूर्ण केलंय. अनंत यांनीही ब्राऊन युबीव्हर्सिटीतून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.
आता जाणून घेऊया अदानींच्या मुलांबाबत
करण अदानी
गौतम अदानी यांचे थोरले सुपुत्र करण यांनी अमेरिकेतून Purdue University मधीं अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. या युनिव्हर्सिटीची वार्षिक फी साधारणतः 37 लाख रुपये आहे.
जीत अदानी
गौतम अदानी यांचे धाकटे सुपुत्र जीत यांनी पेंसल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमधील स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाईड सायसन्स मधून पदवी घेतली आहे. इथे वार्षिक फी 55 ते 60 लाख रुपये आहे.
अदानी यांच्यानंतर आता जाणून घेऊयात मित्तल, बिर्ला आणि प्रेमजींबाबत
आदित्य मित्तल
लक्ष्मी निवास मित्तल यांचे सुपुत्र आदित्य यांनी जकार्ता इंटरनॅशनल स्कुलमधून आपलं हायस्कुल शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर त्यांनी पेंसल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमधील व्हार्टन स्कुलमधून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे.
अनन्या बिर्ला
आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची सुकन्या अनन्या यांनी युनायटेड किंगडममधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे.
रिषद प्रेमजी
विप्रो चे चेअरमन अजीम प्रेमजी यांचे थोरले सुपुत्र रिषद प्रेमजी यांनी हार्वर्ड बिझनेस स्कुलमधून MBA आणि अमेरिकेतील Wesleyan University मधून अर्थशास्त्रात BA केलं आहे. रिषद यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधूनही शिक्षण केलं आहे. हार्वर्ड बिझनेस स्कुलची वार्षिक फी जवळजवळ 60 लाख रुपये आहेत.