Rishabh Lavania Success Story: बारावी उत्तीर्णाकडे करिअरचे अनेक पर्याय असतात. दुसरीकडे बारावी अनुत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी आपला विश्वास गमावून बसतात. पण या विद्यार्थ्यांनी हार न मानता मेहनत घेतली तर त्यांच्या वाट्याला यश येतं. याचं एक मुर्तीमंत उदाहरण जाणून घेऊया. एक विद्यार्थी बारावी नापासांसाठी पर्याय काय? असे गुगलला सर्च करत होता. तो बारावी नापासदेखील झाला. त्यानंतर पुढच्या 7 वर्षात त्याने स्वत:ला पूर्णपणे बदललं आणि आज तो कोट्यावधीचा मालक बनलाय. त्याच्या यशाची कहाणी जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ लवानिया सध्या 30 वर्षांचा आहे. पण त्याची कहाणी 17 वर्षापासून सुरु झालीय. आज तो कोट्यावधी तरुणांसाठी आयडॉल बनलाय. मध्यम वर्गीय परिवारातून आलेला ऋषभ वडिलांप्रमाणे सिव्हिल इंजिनीअर बनू इच्छित होता. पण बारावी नापास झाल्याने त्याचे स्वप्न तुटले. बारावी नापास झाल्यास काय पर्याय आहेत? असे तो गुगलवर सर्च करायचा. आपल्याकडे अनुभव कमी आहे हे ऋषभला माहिती होते. दरम्यान त्याने व्यवसाय करणाऱ्या मित्रांसोबत मैत्री केली. काही इन्व्हेस्टमेंट एनालिस्टसोबत बोलणी सुरु केली. 


आयडीया 6 ते 7 महिन्यातच फ्लॉप


ऋषभने गुडगाव येथे रेड कार्पेट नावाची आपली पहिली इव्हेंट बेस्ड कंपनी सुरु केली. पण त्याची ही आयडीया 6 ते 7 महिन्यातच फ्लॉप झाली. यानंतर त्याने जस्ट गेट इट नावाची रेस्तरों लॉजिस्टिक फर्म सुरु केली. इथपासून सुरु झालेला त्याचा प्रवास इगोन जेंडर नावाच्या ग्लोबल एक्झिक्युटीव्ह सर्च फर्ममध्ये काम करण्यापर्यंत येऊन थांबला. 


जगभरात फिरायला सुरुवात 


ऋषभ 2015 मध्ये अमेरिकेला गेला. तिथे त्याची भेट केशु दुबे यांच्याशी झाली. त्या दोघांनी मिळून Xelert8 नावाची डेटाबेस टेक कंपनी सुरु केली. यानंतर ऋषभने एक गुंतवणुकदार म्हणून जगभरात फिरायला सुरुवात केली. त्याने भारत, चीन, अमेरिका आणि जपान सारख्या देशात जाऊन स्टार्टअपबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 


काही दिवसातच Xelert8 कंपनीला एका चीनी कंपनीने चांगली रक्कम देऊन विकत घेतले. यानंतर ऋषभ स्वत: दुसऱ्यांना इन्व्हेस्टर म्हणून सक्षम झाला. ग्राऊंड लेव्हलवरुन येणाऱ्या, तळागाळाची माहिती असलेल्या गुंतवणूकदारांच्या व्यवसायात मी गुंतवणूक करतो. कारण अशा आयडिया वॅल्ह्यू फॉर मनी असतात, असे ऋषभ सांगतो. 


आफ्रीकी उद्योजकांना यायचंय भारतात


ऋषभ लवानियाला आपला नवा प्रोजेक्ट Weetrackers खूप मोठा करायचा आहे. हे एक मीडिया प्लॅटफॉर्म असून लोकांना बिझनेस पर्सनालिटी आणि उद्योजकांच्या कहाण्या वाचता येतात. या प्रोजेक्टसाठी आपण भारत सरकार आणि नेदरलॅण्ड सरकारसोबत मिळून काम करत असल्याचे ऋषभ सांगतो. दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय उभारणीस करण्यास मदत करणे हा यामागचा उद्देष असल्याचे ऋषभ सांगतो. माझ्याकडे आफ्रीकी उद्योजकांची यादी आहे. त्यांना उद्योजकता शिकण्यासाठी भारतात यायचंय, असे तो सांगतो.