मुंबई : कोरोनाचा (Corona Infection)  संसर्ग होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांमध्ये इंफेक्शन झालेलं असतं. सर्वांना ते कमी अधिक प्रमाणात असतं. कोरोनामुळे फुफ्फुसात झालेलं नुकसान भरुन निघण्यासाठी कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी लागतो. असं डॉक्टरांचं मत आहे. पण अनेक जण कोरोनावर मात केल्यानंतर सिगारेट ओढत असताली त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण यामुळे फुफ्फुसांमध्ये अधिक नुकसान होऊ शकतं. तसेच रिकव्हरी होण्यासाठी देखील आणखी वेळ लागू शकतो. रुग्णांनी तंबाखू खाणे देखील टाळलं पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा व्हायरस (Corona virus) शरीरात ACE-2 रिम्पेटर्समधून पोहोचतो. हा एक ऐमा एंजाइम आहे. ज्यामुळे नाकातील स्पाइक प्रोटीनशी व्हायरस जुडतो आणि त्यांचा अधिक संसर्ग पसरवतो. स्मोकर्समध्ये एसीई-2 ची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा धोका वाढतो.


कोरोना व्हायरस शरीरात असल्याने तंबाखू आणि सिगारेट ओढणं यामुळे इतरांना देखील धोका वाढू शकतो. कारण सिगारेट ओढताना किंवा तंबाखू खाताना व्यक्ती पुन्हा-पुन्हा थुंकतो. ज्यामुळे इतरांना ही धोका वाढतो. तसेच एकच सिगारेट अनेक जण शेअर करुन पित असल्याने ही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक राज्यात अजूनही लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांनी तंबाखू सोडली. एक्शन ऑन स्मोकिंग एंड हेल्थ संस्थेच्या माहितीनुसार, 10 लाख लोकांनी सिगारेट सोडली. 5.5 लाख लोकं सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 24 लाख लोकांनी नशेच्या गोष्टी बंद केल्या आहेत. ज्या लोकांना तंबाखू सोडायची आहे त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे.


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तंबाखू सोडण्यासाठी आपल्या मित्रांना, नातेवा आग्रह केला पाहिजे. हळूहळू करुन त्यांना या गोष्टी सोडण्याची सवय लावली पाहिजे. जेव्हा या गोष्टींची तलप लागली तेव्हा इतर कामात स्वतःला व्यस्त करुन घ्या. 


देशात जवळपास 27 कोटी लोकांना तंबाखू आणि स्मोकिंगची सवय आहे. यामध्ये 12 कोटी लोकं सिगारेट ओढतात. ज्यामुळे वर्षाला जवळपास 12 लाख लोकांचा मृत्यू होतो. यामुळे 40 प्रकारचे कॅन्सर आणि 25 प्रकारचे इतर आजार होतात. 500 प्रकारचे धोकादायक गॅस 7 हजारहून अधिक रसायन यामध्ये असतात. स्मोकिंगचा धूर 30 टक्के फुफ्फुसे आणि 70 टक्के वातावरण खराब करते.