कानपूर: महामार्गावरून जाताना आपण बऱ्याचदा वेगानं जातो. त्या स्पीडवरचंही नियंत्रण आपल्या हातात राहात नाही. त्यामुळे अपघात होत असतात. असाच एक भयंकर अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो चालकालाही नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार भरकटली. कार थेट टेम्पोवर जाऊन आदळली. तर त्यानंतर ही कार डिव्हायडरवर आदळली आहे. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 



ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात पाहून घटनास्थळावरील लोकांनी आरडाओरडा सुरू केला. ही घटना कानपूर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. 


अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात टेम्पो चालक आणि कार चालक जखमी झाला आहे. तर पांढऱ्या कारने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सुदैवानं त्याचा जीव वाचला आहे.