मुंबई : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे. अरुण जेटली यांनी रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेसचा प्रचार करणार असल्याने त्यावर टीका केली होती. त्यावर वाड्रा यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, 'प्रत्येक व्यक्तीचा कोणत्याही परिस्थितीत सन्मान आणि शिष्टाचार ठेवला पाहिजे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉबर्ट वाड्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सन्मान आणि शिष्टाचार ठेवणं हे व्यक्तीचं कॅरेक्टर दर्शवतं. मी माझे मित्र आणि खेळाच्या माध्यमातून हे शिकलो आहे. स्वस्थ प्रतिस्पर्धेच्या माध्यमातूनच व्यक्तीचं चांगलं कॅरेक्टर लोकांसमोर येईल. ज्यावर लोकं निर्णय घेतील. प्रत्येकाला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा'


रॉबर्ट वाड्रा हे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी प्रचार करणार आहेत. यावर जेटली यांनी म्हटलं की, यामुळे मला नाही वाटत की काँग्रेसला फायदा होईल.'



सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्ज भरताना देखील ते उपस्थित राहतील असं म्हटलं जात आहे. याआधी देखील ते उपस्थित राहायचे. पण आता ते पहिल्यांदाच प्रचार करताना दिसणार आहेत.


रॉबर्ट वाड्रा यांनी याआधी फेसबुकवरच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली होती. वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना उमेदवारी न दिल्याने देखील त्यांनी भाजपवर टीका केली होती. वाड्रा यांनी म्हटलं होतं की, जर तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सल्ला नाही ऐकत तर हे लज्जास्पद आहे. पक्षाचे आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीला विसरत चालले आहेत.