इस्तांबूल : पन्नाशीनंतर माणसाला निवृत्तीचे वेध लागतात. पण अमेरिकेतल्या रोसी स्वाले पोप ही तरुणी पायी जग फिरायला निघालीय. आतापर्यंत त्या १३ देश पायी फिरल्या आहेत. रोसी खरं तर ७३ वर्षांच्या आजी आहेत. पण रोसींना आम्ही तरुणी यासाठी म्हणतो, काठीच्या आधारानं चालण्याच्या वयात रोसी धावताना दिसतात... तेही एवढं तेवढं नाही... अमेरिकेतल्या ब्राईटनपासून नेपाळच्या काठमांडूपर्यंत ६ हजार किलोमीटरचं अंतर त्यांनी धावायला सुरुवात केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै २०१८ मध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केलीय. रोज त्या २० किलोमीटर अंतर धावतात. त्यांच्यासोबत त्यांची तीन चाकांची सायकल आहे. ज्यावर काही कपडे आणि खाण्याचे पदार्थ असतात. या सायकलची एक दोरी रोसी यांच्या कंबरेला असते. 


सौ. सोशल मीडिया

रात्री त्यांचा मुक्काम निश्चित ठिकाणी नसतो. जेव्हा झोप येईल थकवा येईल तिथं त्या थांबतात... थोडं झोपतात... सकाळ झाली की पुन्हा धावायला सुरुवात करतात.


अमेरिकेतून निघालेल्या रोसींनी आतापर्यंत १३ देश ओलांडले आहेत. सध्या त्या तुर्कीत आहेत. पुढचा चौदावा देश असणार आहे जॉर्जिया...


लोकांचं आरोग्य शिक्षण आणि जीवनमान उंचवावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या एका प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी रोसी जगभर धावतायत. 


७३ व्या वर्षी रोसी आजींचा हा उत्साह पाहून त्यांना आजीबाई म्हणवासं वाटतच नाही.... रोसी आजींच्या या उत्साहाला सलाम...