धक... धक... धक...! मार्केट गाजवण्यासाठी रॉयल इनफिल्डची ईलेक्ट्रिक बाइक लवकरच येणार बाजारात
Royal Enfield Electric Motorcycle: रॉयल इनफिल्डची भारतीय ग्राहकांमध्ये मोठी क्रेझ आहे. कंपनी आता आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : Royal Enfield Electric Motorcycle : ऑगस्ट 2020 मध्ये रॉयल इनफिल्डचे सीईओ विनोद दसारी यांनी या गोष्टीला दुजोरा दिला होता की, आयशरचे मालकी असलेली कंपनी इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये एन्ट्री घेणार आहे. या घोषणेनंतर भारतीय बाइक निर्माती कंपनीनेही 2020-21च्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक रेंजवर काम करीत आहे. टीव्हीएस, हिरो, एथर आणि बीएमडब्लूसारख्या मोठ्या कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने काही दिवसात भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत आत रॉयल इनफिल्ड देखील उतरणार आहे.
रॉयल इनफिल्डच्या इलेक्ट्रिक व्हेहिकलचे प्रोटोटाइप तयार
रॉयल इनफिल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि परदेशातील बाजारात रॉयल इनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइक्स पोहचवण्यासाठी प्रोडक्शन लाइन तयार करण्यात आली आहे.
पर्यावरणाला अनुकूल अशा या वाहनाची निर्मितीसाठी रॉयल इनफिल्ड तयार आहे. पुढे त्यांनी म्हटले की, रॉयल इनफिल्डने इलेक्ट्रिक बाइक्सचा प्रोटोटाइप तयार केला आहे. तसेच त्याचे उत्पादनही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बाइक लॉंच करण्यासोबतच आधुनिक फीचर्स दिले जाणार आहेत.
इलेक्ट्रिक बाइक्स कधी लॉंच होणार?
रॉयल इनफिल्ड 2023 मध्ये बाइक लॉंच करण्याच्या प्रयत्नात आहे. याची तयारी म्हणून युनायटेड किंगडम स्थित कंपनी इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप तयार करीत आहे.
इनपुटवर पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. योग्यवेळी इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणण्यात येणार आहे.
मार्केटमध्ये सध्याचा ट्रेंड पाहता बाइकची मोटार 40 बीएचपी शक्ती आणि 100 एनएम पीक टॉर्क क्षमतेची असणार आहे.