Fact Check : पुन्हा येणार 1000 रुपयाची नवी नोट, काय आहे सत्य जाणून घ्या
video viral 1 जानेवारीपासून पुन्हा येणार 1000 रुपयांची नवी नोट, बंद होणार 2000 रुपयांची नोट, चाललंय तरी काय?
1000 Rupees Note : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 साली 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याची महिती दिली होती. पण आता पुन्हा 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा परत येणार असल्याच्या बातम्यांना मोठं उधाण आलं आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नवीन नोटा भारतात आल्या. पण आता भारत सरकार या 2000 रुपयांच्या नोटा बंद करणार आहेत अशी बातमी समोर येत आहे. या बातमींमुळे लोकांमध्ये गोंधळ सुरु झालाय. अनेकजण या बातम्यांना बळी न पडून चुकीची पावलं उचलतात. अशात त्यामागील सत्यता जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
नेमकं व्हिडिओत काय?
हल्ली सोशल मीडियावर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओला अनेक नेटकरी पसंती दाखवतात तर काही थक्क बसतात. अशा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये गैरसमज वाढतात. या व्हिडिओत 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांची नवीन नोट येणार आहे. तर 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 50 हजार रुपये बँकेत जमा करण्याची परवानगी असेल आणि 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी तुमच्याजवळ फक्त 10 दिवसांची मुदत असेल. मुदत सपंल्यानंतर भारतीय बाजारात 2 हजाराच्या नोटांची किंमत राहणार नाही. त्यामुळे वेळीच 2000 रुपयांच्या नोट बदला किंवा सोबत ठेवू नका असं त्या व्हिडिओत सांगण्यात येत आहे.
1000 रुपयांच्या नवीन नोटा चलणात येणार का?
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे अनेकांना नोटाबंदीत लांबलचक रागेंची आठवण नक्कीच झाली असेल. 1 जानेवारी 2023 पासून 1000 रुपयांच्या नवीन नोटा चलणात आणल्या जातील आणि 2000 च्या नोटा बंद केल्या जातील असं त्या व्हिडिओत सांगण्यात येत आहे. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचला आहे त्या सगळ्यांचे टेन्शनमध्ये वाढ झालेलं पाहायला मिळत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमधील मॅसेजमुळे अनेक लोकांची फसवणूक होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणून पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याची चौकशी करताना खरं काय आहे हे समोर आणलं आहे.
PIB Fact Check तपशील
हा व्हिडिओवर पीआयबीनं तपशील दिला. या व्हिडिओमधील दावा पुर्णपणे खोटा आहे असं पीआयबी फॅक्ट चेकच्या तपासणीत आढळले. केंद्र सरकारने (भारत सरकार) 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. लोकांना असे दिशाभूल करणारे मेसेज अजिबात फॉरवर्ड करू नये असे आवाहन PIB Fact Check ने केले आहे.