भुवनेश्वर : 'फोनी' चक्रीयवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि पश्चिम बंगाल या २ राज्यांना मोठ्या प्रमाणात बसला. या वादळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पण आता त्यांच्या मदतीसाठी अनेक मंडळी मदतीचा हात पुढे करत आहेत. फिक्की ओडिशा स्टेट काउंसील आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच अध्यक्ष, IMFA शुभ्रकांता पांडा यांनी चक्रीयवादळाने प्रभावित असलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यावसायिक जगातून ओडिशातील फॉनी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना कंपनीने मदत करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ७५ लाख रूपये मदत म्हणून देणार असल्याचं सांगितलं आहे.


मदतीचं आवाहन करताना शुभ्रकांता पांडा म्हणाले की, 'राज्य आणि केंद्र सरकारने शक्य तेवढी मदत ओडिशातील लोकांना करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण व्यावसायिक जगतातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा निधी उभारण्यासाठी मदत करावी.


आयएमएफए मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून ७५ लाख देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच इतरांनी पुढे यावे, यासाठी मी आवाहन करतो', वॉलंटियर्स चौडार आणि सुकिंदामध्ये लोकांना मदतीसाठी साहित्य वाटप करीत आहेत.


IMFA (इंडियन मेटल आणि फेरो एलॉयज) देशातील सर्वात मोठी फेरोक्रोम निर्माता कंपनी आहे. IMFA वर्षाला २७५,००० टन फेरोक्रोमचं उत्पादन करते. या कंपनीची स्थापना १९६१ मध्ये झाली होती. या कंपनीचं मुख्यालय भुवनेश्वर (ओडिशा) मध्ये आहे. कंपनीचं थेरूबली आणि चौडारमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स आहे. IMFA कडे गुणवत्ता, पर्यावरण आणि व्यावसायिक सुरक्षा एकीकृत व्यवस्थापन प्रणाली आहे.


काही दिवसांपूर्वी 'फॅनी' चक्रीयवादळाचा ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. या वादळाचा वेग ताशी २२५ किमी एवढा होता. वैज्ञानिकांच्या आणि सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. पण या वादळामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तर ३५ जणांचा मृत्यू झाला.