Mohan Bhagwat Statement : झारखंडच्या गुमला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय. विकासाला अंत नसतो, माणसाला सुपरमॅन बनायचे असते, मग देवता बनायचे असते. अंतर्गत आणि बाह्य विकासाला कधीच अंत नसतो, असं म्हणत मोहन भागवत यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता मोहन भागवत यांचा टोला नेमका कुणावर? असा सवाल विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास भारती या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत भागवत बोलत होते. त्यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं. देशाच्या भविष्याबाबत शंका नाही, चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. प्रत्येकजण यासाठी काम करत आहे, आम्हीही प्रयत्न करत आहोत, असं भागवत म्हणाले. प्रगतीला अंत नसतो. लोकांना सुपरमॅन व्हायचे असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही, मग त्याला 'देवता', मग 'भगवान' बनायचे असते, पण 'भगवान' म्हणतो की तो 'विश्वरूप' आहे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?


माणसाला सुपरमॅन व्हायचंय. सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, त्यामुळेच मी एका रुपात दिसतोय, पण माझे एक निराकार रूप आहे जे जगाला व्यापून आहे. म्हणून असे म्हणता येईल की विकासाला अंत नाही, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.