हिंदूंचे संघटन म्हणजे इस्लामला विरोध नव्हे- भागवत
यावेळी सरसंघचालकांकडून संघाची भविष्यातील वाटचाल आणि धोरणांवर भाष्य केले जाते.
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरातील रेशीमबाग येथील मुख्यालयात विजयादशमी मेळावा दिमाखात पार पडला. यावेळी पारंपरिक रिवाजानुसार संघाच्या स्वयंसेवकांकडून पथसंचलन शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. विजयादशमीच्या मुहूर्तावर सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी सरसंघचालकांकडून संघाची भविष्यातील वाटचाल आणि धोरणांवर भाष्य केले. यंदाच्या विजयादशमी मेळाव्याला राज्यातील विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा सरसंघचालक कोणत्या मुद्द्यांना स्पर्श करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अपेक्षेप्रमाणे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केल. सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय धाडसी आणि कठोर होता, असे त्यांनी सांगितले. यावेळी मोहन भागवत यांनी इस्रोच्या चांद्रयान-२ मोहीमेचेही कौतुक केले. तसेच झुंडबळी, अर्थव्यवस्था, हिंदूराष्ट्र अशा मुद्द्यांवरही सविस्तरपणे भाष्य केले.
मोहन भागवतांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
* तुम्हाला आमचे विचार मान्य असतील तर संघाच्या कार्यांना हातभार लावा- भागवत
* समाज घडवण्याचा ठेका संघानेच घेतलेला नाही- भागवत
* सामर्थ्याबरोबर चारित्र्य असेल तरच शक्तीला अर्थ असतो- भागवत
* सामर्थ्य नसल्याशिवाय कोणीही ऐकत नाही- भागवत
* मानवधर्म हाच हिंदू धर्म- भागवत
* भारतीय शब्दाला आमचा आक्षेप नाही- भागवत
* देशभक्त आणि माणुसकी असणारे सर्वजण हिंदू- भागवत
* संघाला केवळ हिंदूराष्ट्र घडवायचे नाही, कधी घडवणारही नाही- भागवत
* हिंदूंचे संघटन म्हणजे इस्लाम किंवा अन्य धर्मांना विरोध नव्हे- भागवत
* गोळवळकर गुरुजी हिटलरला आदर्श मानायचे, ही गोष्ट साफ चुकीची- भागवत
* संघाविषयी गैरसमज पसरवले जातात- भागवत
* माध्यमांनी मसालेदार बातम्या देण्याचा मोह टाळावा, सकारात्मक गोष्टी दाखवल्या जाव्यात- भागवत
* आपणच मुलांना फक्त पैसा कमावणे, हेच उद्दिष्ट असल्याचे शिकवले- भागवत
* व्यसन आणि भ्रष्टाचार कुटुंबातील संस्कारांनीच नष्ट करता येईल- भागवत
* महिलांना बरोबरीच्या संधी दिल्या पाहिजेत, त्यांचा विकास झाला पाहिजे- भागवत
* समाजात महिलांवर होणारा अन्याय रोखलाच पाहिजे- भागवत
* कुटुंबव्यवस्था जोपासणे आवश्यक- भागवत
* अभ्यासक्रमाचे केवळ स्वरूप बदलून चालणार नाही, त्यामध्ये संस्कारांचा अंतर्भाव केला पाहिजे- भागवत
* स्वभाषा, स्वदेशी, स्वभूमी, स्वत:विषयी आदर असणारे शिक्षण आवश्यक- भागवत
* चांगला माणूस होण्यासाठी शिक्षण आवश्यक- भागवत
* शिक्षण हे केवळ पोट भरण्याचे साधन आहे का?- भागवत
* धोरणांच्या प्राप्तीसाठी मनात सुस्पष्टता हवी- भागवत
* प्रचलित अर्थव्यवस्थेची जीडीपीसारखी मानके अपूर्ण- भागवत
* स्वदेशीचा अंगीकार करण्यासाठी अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल करण्याची गरज- मोदी
* आपल्या अटींवर इतर देशांशी व्यापार करणे म्हणजे स्वदेशी- भागवत
* आपल्या देशात गोष्टींची निर्मिती होत असेल तर दुसऱ्या देशांकडून आयात का करायची- भागवत
* ज्या गोष्टींची घरी निर्मिती होते, त्या मी बाजारातून आणणार नाही- भागवत
* स्वदेशी म्हणजे जगाशी संबंध तोडणे हा चुकीचा समज- भागवत
* सरकारने अर्थव्यवस्थेची छिद्रे बुजवली- भागवत
* पर्यटन आणि लघुद्योगांना चालना देण्याची गरज, रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध- भागवत
* चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्धासाठी सरकार काही करू शकत नाही- भागवत
* मात्र, एकट्या सरकारने उपाययोजना करुन फायदा होणार नाही- भागवत
* सरकारने उपाययोजना केल्या आहेत- भागवत
* नकारात्मक चर्चा करून वातावरण आणखी गढूळ होते- भागवत
* विकासदर शून्य टक्क्याच्या खाली गेल्यानंतर मंदी येते, आपला विकासदर अजूनही पाच टक्के- भागवत
* देशाचा विकास होतोय, पण ठराविक काळानंतर अर्थव्यवस्थेत गतिरोधक येतात- भागवत
* निर्णय मान्य नसेल तर कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा- भागवत
* निर्णय मान्य करायला पाहिजे, कलह नको- भागवत
* कायद्याच्या नियमांचे पालन सक्तीने झाले पाहिजे, ही राजाची जबाबदारी- भागवत
* झुंडबळीसारख्या घटनांमधील दोषांनी कडक शासन करा- भागवत
* कोणी कितीही चिथावले तरी मर्यादा सोडू नका, भागवतांचा स्वयंसेवकांना सल्ला
* चुकीच्या घटना घडत असतील तर दोषारोप करण्याऐवजी त्याठिकाणी सुधारणा झाल्या पाहिजेत- भागवत
* इतकी विविधता असलेले समुदाय शांततेने भारतात नांदतात, जगात असा दुसरा कोणताही देश नाही- भागवत
* झुंडबळी हे लहानमोठ्या गटांचे कृत्य; त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे- भागवत
* झुंडबळी ही आपली परंपरा नाही, मात्र देशाची बदनामी केली जात आहे- भागवत
* मात्र, या सगळ्यात संघाला गोवण्याचे षडयंत्र सुरु आहे- भागवत
* संघाचा कोणताही स्वयंसेवक झुंडबळीसारख्या प्रकारांमध्ये सहभागी होत नाही- भागवत
* झुंडबळीच्या घटनांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले जाते- भागवत
* समाजातील काही लोकांनी केलेल्या कृत्यासाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरले जाते- भागवत
* काहीवेळा चिथावणी दिल्यामुळे झुंडबळीसारख्या घटना घडतात- भागवत
* फक्त एकाच समुदायाकडून अशा घटना घडत नाहीत, उलट प्रकारही घडतात- भागवत
* झुंडबळीच्या घटनांवर मोहन भागवत यांचे भाष्य
* नागरिकत्वाच्या नियमांचे पालन करणे ही देशभक्ती असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते- भागवत
* 'हम ये है, मतलब हम ये नही है' असा एक वर्ग समाजात अस्तित्त्वात आहे- भागवत
* काहीजण समाजात फूट आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायंत- भागवत
* देशात पूर्णपणे एकोप्याची भावना नसल्यामुळे समाजात भेद आहे- भागवत
* समाजातील एकोपा हीच समाजाची खरी प्रतिकारशक्ती- भागवत
* काहीजण केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध करतात- भागवत
* देशातील परिवर्तन अनेकांना आवडलेले नाही- भागवत
* संकट ही येतच असतात- भागवत
* देशातील नक्षलवादाचे प्रमाण कमी झाले आहे- भागवत
* भारतीय लष्कराचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे- मोहन भागवत
* भारत हा पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित झाला आहे- मोहन भागवत
* चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचे धाडस कोणीही दाखवले नव्हते, मात्र भारताने ते दाखवले- भागवत
* मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा कठोर आणि साहसी निर्णय घेतला- भागवत
* देशात बदल घडत असल्याचा जनतेला विश्वास वाटतो, त्यामुळेच निवडून दिले- भागवत
* २०१४ मध्येच निवडून दिलेल्या सरकारला देशाने पुन्हा निवडून दिले- भागवत
* प्रजातंत्र ही व्यवस्था पाश्चिमात्य देशांची देणगी नव्हे- भागवत
*इतक्या मोठ्य़ा देशात निवडणुका कशा होतात, याचे जगाला आश्चर्य वाटते- भागवत
* भारतातील लोकसभा निवडणुकांचे जगाला आश्चर्य वाटते- भागवत
* मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरुवात
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरीही विजयादशमी मेळाव्याला उपस्थित