Latest Political Update: संघ परिवारातल्या राष्ट्रीय ईसाई मंच या संस्थेने आज ख्रिसमस पार्टीचं (chrismas party) आयोजन केलं आहे. संघ परिवाराकडे ख्रिस्ती समाजाला आकर्षित करण्यासाठी ही संस्था काम करते. केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी नवी दिल्लीतल्या मेघालय हाऊसमध्ये या ख्रिसमस पार्टीचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंतच्या अनेक चर्चेसचे प्रमुखही सहभागी होतील. संघ परिवारातली संस्था अशी ख्रिसमस पार्टी करत असल्याने सध्या हा उत्सुकतेचा विषय झाला आहे. (RSS Political Strategy Organize Christmas Party to impress Kerala Christian Voters Marathi News)


उपस्थिती कोणाची? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिश्चन समाजाला जोडण्यासाठी संघ परिवार (RSS) प्रयत्न करत आहे. आता प्रथमच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला शुक्रवारी मेघालय हाऊसमध्ये ख्रिसमस डिनरचे आयोजन करणार आहेत. आरएसएसशी संलग्न राष्ट्रीय ख्रिश्चन फोरमच्या या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंतचे चर्च प्रमुख सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील चर्च प्रमुखांनाही राष्ट्रीय ख्रिश्चन मंचातर्फे निमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिथे पाद्री, चर्च आणि काही ख्रिश्चन संस्थांवर हल्ले झाल्याच्या घटना काही काळापासून समोर आल्या आहेत. 


हेही वाचा - Fact check : गायीच्या दूधामुळे कोरोना बरा होऊ शकतो? काय आहे सत्य...


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात भाजपचे आमदार 


भाजपचे (BJP) आमदार 27 तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार आहेत. 27 तारखेला भाजपचे आमदार आद्यसरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या समाधिस्थळाचं दर्शन घेणार आहेत. सकाळी आठ वाजता भाजपने आमदार रेशीमबाग येथील स्मृतीमंदिर येथे जाणार आहेत. संघाचे नेते भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कळते आहे. हिवाळी अधिवेशन भाजपचे आमदार नागपूरात असल्याने रेशीमबागेत जाणार असल्याची माहिती कळते आहे. शिंदे गटाचे आमदार जाणार की नाही? याबाबत अद्याप शिंदे गटाचा (Shinde Gat) निर्णय झाला नाही असेही कळते आहे.    


सध्या सगळीकडेच ख्रिसमसचा माहोल आहे. त्यामुळे सगळेच उत्साही आहेत. आता सध्या सगळ्यांना सुट्या लागल्यानं. सगळेच व्हेकेशन मूडमध्ये आहेत. लवकरच आपण सगळेच जणं न्यू इयर सेलिब्रेशन करू आणि आपण सगळेच नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. येतं वर्ष हे आपल्या सर्वांसाठीच आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या परीनं आपल्या नव्या वर्षाची सुरुवात आनंददायी आणि वेगळी करायची आहे.