मुंबई :  ज्ञानवापी मशीद की मंदिर, यावरून सध्या देशातलं वातावरण तापलंय. काशीपाठोपाठ मथुरेतल्या मशिदीचा वादही गाजतोय. असं असताना आता राममंदिरानंतर कोणतंही आंदोलन होणार नाही, अशी परखड भूमिका सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतलीय.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हा ठाम पवित्रा का घेतलाय, पाहूयात हा रिपोर्ट. (rss sarsanghchalak mohan bhagwat on gyanvapi controversy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसंघचालक मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या. अयोध्येनंतर काशी आणि मथुरेत मशीद-मंदिर वाद उफाळून आलाय. कुतुब मिनार हा मूळचा विष्णूस्तंभ असल्याचा वादही गाजतोय. मात्र असे वाद उकरून काढणं टाळलं पाहिजे. 


प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता? अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवतांनी कानउघाडणी केलीय. राममंदिरानंतर आता कोणतंही आंदोलन होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


मुघलांच्या काळात मूळची हिंदू मंदिरं पाडून त्याठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या, अशी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची धारणा आहे. त्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातायत. पण मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच होते. त्यामुळं आपापसात चर्चा करून वाद मिटवा, असा तोडगा भागवतांनी सुचवलाय.


भागवतांच्या या भूमिकेचं शिवसेनेनं स्वागत केलंय. तर एमआयएमनं मात्र त्यांच्यावर शंका उपस्थित केलीय. बाबरी मशिदीसाठी आंदोलनाचं रान पेटवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि बाबरी पाडल्याचा सार्थ अभिमान मिरवणाऱ्या शिवसेनेची ही समंजस भूमिका.समाजातली हिंदू-मुस्लीम दरी मिटवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.