Mohan Bhagwat : 40 हजार वर्षांपासून प्रत्येक भारतीयाचा DNA एकच : मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावरही चिंता व्यक्त केलीय.
मुंबई : देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए (DNA) 40 हजार वर्षांपासून एकच आहे, असं सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलंय. त्याचवेळी जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावरही भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी पुन्हा एकदा डीएनएचा उल्लेख केलाय. भारतात राहणा-या प्रत्येकाचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे, भलेही मग तो हिंदू असेल वा मुसलमान. सर्वांचा डीएनए एकच आहे असं मोहन भागवतांनी म्हटलंय. (rss sarsanghchalak mohan bhagwat says everyone living in india is a hindu)
सरसंघचालकांनी जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावरही चिंता व्यक्त केलीय. जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरावर सुप्रीम कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणाचाही भागवतांनी दाखला दिला.
भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्म आणि आस्थेनुसार पूजा करण्याचा अधिकार दिलाय. पण कुणालाही आपला धर्म दुस-यावर लादण्याचा, आमिष दाखवून किंवा दबाव टाकून धर्मपरिवर्तनाचा अधिकार नाही. याचाच दाखला भागवतांनी दिला, त्याचवेळी प्रत्येक भारतीयाचा डीएनए एक असल्याचं मोठ विधान भागवतांनी केलं.