Rules Changing from January 2024 : नव्या वर्षाच्या सुरूवातीला आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. याशिवाय काही महत्त्वाच्या कामांची मुदतही संपणार आहे. त्यामुळे काही कामं तुम्हाला या वर्षाअखेर पूर्ण करावी लागतील. नाहीतर तुम्हाला नव्या वर्षात संकटाचा सामना करावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्नपासून ते म्युच्युअल फंडच्या नव्या नियमांनुसार काय बदल करावे लागतील? पाहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेबीचा नवा नियम


जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी नॉमिनी जोडावे लागतील, कारण सेबीने 31 डिसेंबर ही डिमॅट खात्यात नॉमिनेशनची अंतिम तारीख दिलीये. जर नॉमिनी जोडला गेला नाही तर, डिमॅट खातं गोठवलं जाऊ शकतं.


लॉकर करार 


आरबीआयने सर्व बँकांना लॉकर करार सुधारित करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. जर तुम्ही असं केलं नाही तर बँक लॉकर खाली करावं लागेल.


SBI मध्ये एफडी तर नाही?


स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना देखील 31 डिसेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. 400 दिवसांची एफडी ज्यावर 7.60 टक्के व्याज मिळतं. ते आता बंद होणार आहे.


इन्कम टॅक्स रिटर्न भरला का?


जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. आयकर विभागाने 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख निश्चित केली होती, परंतु अनेक करदात्यांनी अद्याप आयटी रिटर्न भरले नाहीत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह अद्यतनित आयटीआर दाखल करावा लागणार आहे. अन्यथा दंड भरावा लागेल.


तुमचा युपीआय बंद होणार?


जर तुम्ही तुमच्या कोणत्याही एका युपीआय आयडीवरून कोणतंही पेमेंट केलं नसेल तर आत्ताच एक पेमेंट करा. कारण पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही युपीआय आयडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षापासून वापरले जात नाहीत असे युपीआय बंद केले जातील.