लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या लखीमपपूर खीरी जिल्ह्यात सोशल मीडियावर वेणी कापणाऱ्या टोळीची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती सोशल मीडियावर फेक मॅसेज टाकून वेण्या कापण्याची अफवा पसरवत होता. इन्स्पेक्टर दीपक शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हॉटसअपवर एक संदेश मिळाला होता. आपल्या गावाच्या आजुबाजुला वेण्या कापणारी एक टोळी सक्रीय असल्याचं या मॅसेजमध्ये म्हटलं होतं... आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 


ही निव्वळ एक अफवा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं... आणि पोलिसांनी या मॅसेजचा मागोवा घेत ही अफवा पसरवणाऱ्याला ताब्यात घेतलं. 


मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी ही अफवा पसरवणाऱ्याचं ठिकाण शोधून काढलं. याच आधारे गरदहा गावातील जाहिर खान नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. व्हॉटसअपवर टाकण्यात आलेल्या मॅसेजबद्दल त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण नव्हतं.