आता Decathlon ला 'त्या' ग्राहकाला द्यावे लागणार ₹35000! 'ती' चूक पडली महागात

Decathlon Will Pay Rs 35000 To Customer: डिकॅथलॉन या ब्रॅण्डबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तुमच्यापैकी अनेकांनी तर या भारतामधील सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्सवेअर रिटेल स्टोअरमधून खरेदीही केली असेल. पण या ब्रॅण्डसंदर्भात नुकताच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...

| Sep 25, 2024, 12:03 PM IST
1/9

decathlon

तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या या ब्रॅण्डला ग्राहकाला एवढी मोठी रक्कम देण्यास का सांगण्यात आलं आहे? नेमकं घडलंय काय? जाणून घेऊयात...

2/9

 decathlon

भारतामधील सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्सवेअर रिटेल चैनपैकी एक असलेल्या डिकॅथलॉनला ग्राहक न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ग्राहक न्यायालयाने डिकॅथलॉनला कर्नाटकमधील एका ग्राहकाला तब्बल 35 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आता एवढा मोठा दंड ठोठवण्यामागील कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?  

3/9

 decathlon

तर या कारवाईमागील कारण आहे या डिकॅथलॉन स्टोअरने एका ग्राहकाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ट्राउजर पॅण्टची 1399 ची जोडी वेळेत डिलेव्हर केली नाही. नेमकं घडलं काय आणि कोर्टाने काय म्हटलंय हे जाणून घेऊयात...

4/9

 decathlon

कर्नाटकमधील मंगळुरु येथे राहणाऱ्या 23 वर्षीय मोहित नावाच्या ग्राहकाने डिकॅथनलॉनला दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयामध्ये खेचलं. कंपनीने आपण घेतलेली वस्तूही आपल्याला दिली नाही आणि त्यासाठी अगाऊमध्ये घेतलेले पैसेही परत केले नाहीत असा मोहितचा आरोप होता, अशी माहिती 'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तात दिली आहे.

5/9

 decathlon

मोहित 22 डिसेंबर 2023 रोजी डिकॅथलॉनच्या स्टोअरमध्ये खरेदीसाठी गेला असता तेथील कर्मचाऱ्याने मोहितला त्यांना हवा असलेला प्रोडक्ट बंगळुरुमधील ईटीए मॉलमधील डिकॅथलॉनमध्येच उपलब्ध असल्याचं सांगितलं.  

6/9

 decathlon

ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर प्रोडक्ट तुम्हाला घरपोच दिलं जाईल असं आश्वासन या कर्मचाऱ्याने दिलं. त्यानंतर मोहितने ट्राऊजर पॅण्टच्या जोडीसाठी 1399 रुपयांचं पेमेंट केलं. मात्र त्याला मागील आठ महिन्यात ना हे पैसे परत आले ना प्रोडक्ट त्याला डिलेव्हर करण्यात आलं.   

7/9

 decathlon

6 फेब्रुवारी 2024 रोजी मोहित जेव्हा ईटीए मॉलमधील डिकॅथलॉनमध्ये पोहोचला तेव्हा त्याला तुमचं प्रोडक्ट गहाळ झालं असल्याचं सांगण्यात आलं. तुम्हाला तुमचे पैसे तातडीने रिफंड केले जातील असंही त्याला सांगण्यात आलं. मात्र अनेकदा कस्टमर सपोर्टला कॉल करुनही या ग्राहकाला त्याचे पैसे परत मिळाले नाहीत.

8/9

 decathlon

या दर्जाहीन सेवेला वैतागून अखेर मोहितने 9 एप्रिल रोजी डिकॅथलॉनला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र त्यावेळी ईटीए मॉल बंद झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यानंतर मोहितने ग्राहक न्यायालयामध्ये धाव घेतली. डिकॅथलॉनला अनेकदा नोटीस पाठवूनही कंपनीकडून कोणीही न्यायालयासमोर सुनावणीसाठी हजर राहिलं नाही. 

9/9

 decathlon

अखेर कोर्टाने डिकॅथलॉनला मोहितचे 1399 रुपये परत करण्याबरोबरच सेवेमध्ये कसूर केल्याने ग्राहकाला 25 हजारांची नुकसानभरपाई आणि 10 हजार रुपये मानसिक छळ झाल्याच्या मोबदल्यात द्यावेत असं सांगितलं आहे. त्यामुळे डिकॅथलॉनला हा बेजबाबदारपणा 35 हजारांना पडल्याचं स्पष्ट आहे.