How Many 2000 Rs Notes Back in Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी एका महिन्यामध्ये 2 हजारांच्या (2000 Rs Notes) किती नोटा देशभरातील ग्राहकांनी बँकांमध्ये जमा केल्या आहेत याबद्दलची माहिती दिली आहे. 2 हजारांच्या नोटासंदर्भातील पत्रक 19 मे रोजी जारी करण्यात आल्यानंतर महिन्याभरात जवळजवळ 3.62 लाख कोटी रुपये मुल्यांच्या 2 हजारांच्या चलनी नोटांपैकी दोन तृतीयांशहून अधिक नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. म्हणजेच 2.41 लाख कोटी रुपये मुल्याच्या नोटा बँकांकडे जमा झाल्या आहेत. तसेच 2 हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्यात आल्याने अर्थव्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही असा विश्वास दास यांनी व्यक्त केला. केंद्रीय बँकाने 2 हजारांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय अगदीच अचानक घेतला होता. 30 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना 2 हजारांच्या नोटा बँकांमधून बदलून घेता येणार आहेत.


नेमक्या किती नोटा परत आल्या?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दास यांनी आपल्या कार्यालयामध्ये वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये 2 हजारांच्या एकूण नोटांपैकी 85 टक्के नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच लोक 2 हजारांच्या नोटा बदलून घेण्याऐवजी त्या खात्यावर जमा करत आहेत. यापूर्वी 8 जून रोजी मौद्रिक नीति समीक्षेनंतर दास यांनी 1.8 लाख कोटी मूल्य असलेल्या 2 हजारांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याचं सांगितलं होतं. ही आकडेवारी चलनातील एकूण 2 हजारांच्या नोटांच्या 50 टक्के इतकी होती. 2 हजारांच्या नोटा मागे घेतल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का यासंर्भात भाष्य करताना दास यांनी, "मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की 2 हजारांच्या नोटा परत घेण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही," असं सांगितलं. 


विकास दर किती राहणार?


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालामध्ये रिझर्व्ह बँकेने 2 हजारांच्या नोटा मागे घेतल्याने विक्रीचं प्रमाण वाढेल. त्यामुळे सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक विकास दर हा 6.5 टक्क्यांहून अधिक राहील, असं म्हटलेलं. "2 हजारांच्या नोटा मागे घेण्याच्या निर्णयाचा प्रभाव झाल्याने एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये विकास दर 8.1 असेल असा अंदाज बांधत आहोत. यावरुन असं दिसून येत आहे की आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जीडीपीची वाढ ही आरबीआयच्या अंदाजानुसार 6.5 टक्क्यांहून अधिक असू शकते," असं या अहवालात म्हटलं आहे. 


सकारात्मक परिणाम नंतर समजेल


एसबीआयच्या या अहवालाच्या आधारे प्रश्न विचारण्यात आला असता दास यांनी, "जेव्हा 2 हजारांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्याचा आर्थिक विकासाशी काहीही संबंध नव्हता. या निर्णयाचा जो काही पिरणाम असेल तो नंतरच कळेल. मात्र मी एक गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की आज ज्या काही 2 हजारांच्या नोटा आपण परत घेत आहोत त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम नक्कीच होणार नाही. बाकी याचा सकारात्मक परिणाम किती होतो हे येणाऱ्या काळात समजेल," असं उत्तर दिलं.