मुंबई : आंतरराष्ट्र्रीय स्तरावर डॉलरमधील मोठ्या बदलामुळे भारतीय चलनात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रुपयाचा दर पहिल्यांदा 71 रुपयांच्या जवळ पोहोचला. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी लाट पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलने देखील मोठा उच्चांक गाठला आहे. तसेच केंद्र सरकारने देखील गॅसच्या दरात वाढ केली आहे.


71 रुपयांचा आकडा गाठला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने आपला अगदी निच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात 21 पैशाची घसरण पाहायला मिळाली आहे. आजचा रुपयाचा दर हा 70.95 रुपये आहे. गुरूवारी महिन्याच्या शेवटी डॉलरची मागणी आणि क्रूड ऑईलची मागणी वाढल्यामुळे रुपयात 15 पैसे दर तुटला असून आता तो 70.74 प्रति डॉलर झाला आहे.  इंट्रा डेच्या दरम्यान रुपयाने 70.90 प्रति डॉलर निच्चांक गाठला. त्यानंतर काही सुधारणा वाटली. बुधवारी रुपया 49 पैशांची खाली घसरला असून 70.59 स्तरावर पोहोचला आहे. 


86 रुपयांच्या जवळपास पेट्रोल, दिल्लीत 70 रुपये डिझेल 


शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 22 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटर महागलं आहे. दिल्लीत पहिल्यांदा डिझेल 70 रुपये झालं आहे. शुक्रवारी दिल्लीत एक लीटर डिझेल 70.21 रुपये दर होता. गेल्या एका महिन्यात दिल्लीत पेट्रोल 2.27 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 2.46 रुपये प्रती लीटर पर्यंत पोहोचलं आहे. 


शहर

पेट्रोल

डिझेल

मुंबई

85.93

74.54

चेन्नई

81.58

74.18

कोलकाता

81.44

73.06