भारत रशियाकडून खरेदी करणार जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र
जगातली सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र भारताला मिळणार
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर भारतासोबत एस ४०० क्षेपणास्त्र शोध यंत्रणेच्या खरेदीचा करार होणार आहे. या करारामुळे जगातली सर्वात अत्याधुनिक अशी क्षेपणास्त्र शोध यंत्रणा भारताला मिळणार असून त्यासाठी ५ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करण्यात येणार आहे.
भारताची ताकद वाढणार
या यंत्रणेत ४०० किलोमीटर अंतरावरून एकाच वेळी येणाऱ्या अनेक क्षेपणास्त्रांचा शोध घेऊन त्यांना खाळी पाडण्यासाठी हल्ला करण्याची सोय़ आहे. या खरेदी कराराबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला असून पुतीन आणि मोदींच्या भेटी दरम्यान दोन्ही सरकारचे प्रतिनिधी करारावर सह्या करतील अशी माहिती पुतीन यांचे जवळचे परराष्ट्र सल्लागार युरी उषेगाव्ह यांनी मोस्कोत दिली आहे.