मुंबई : Double Local Gas Prices : आता बातमी सगळ्यांची चिंता वाढवणारी. देशातील गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतात. त्यामुळे सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरगुती गॅसच्या किमती दुप्पट होतील, अशीही शक्यता आहे. (Russia - Ukraine Crisis : Global crunch likely to double local gas prices)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या कहरातून बाहेर येत आहे आणि त्यासोबतच ऊर्जेची मागणीही वाढत आहे. मात्र 2021 मध्ये त्याचा पुरवठा वाढवण्यासाठी पुरेशी पावले उचलली गेली नाहीत. या कारणांमुळे गॅसच्या किमतीत मोठी वाढ झालीये.. त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे..


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 99 डॉलर प्रतिबॅरलवर जाऊन पोहोचलेत. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरानं मोठी उसळी घेतलीये. सप्टेंबर 2014नंतर प्रथमच कच्च तेल 100 डॉलरच्या घरात पोहोचले आहे. 


विशेष म्हणजे कच्चं तेल गगनाला भिडले असताना देशात गेल्या 3 महिन्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात एकदाही वाढ करण्यात आलेली नाही. कारण अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. मात्र निवडणुका संपल्यावर मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.