नवी दिल्ली : चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने रशियाकडून ३० हून अधिक लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. रशिया लवकरच या विमानांची पूर्तता करणार आहे.  MIG 29 आणि SU-30MKT हे विमान यामध्ये असणार आहे. हे लढाऊ विमान भारतीय ताफ्यात आल्याने वायुसेनेची ताकद वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिग २९ च्या रिन्यूएशनसाठी रशियाची मदत घेतली जातेय. आएएफला १९८५ मध्ये आपले पहिले मिग २९ मिळाले. रिन्यूएशनमुळे मिग २९ या लढाऊ विमानाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. रिन्यूएशनमुळे मिग २९ हे चौथ्या पिढीतील लढाऊ विमानांमध्ये गणले जाईल. 



या विमानामुळे अतिशय वेगातही एरियल टार्गेट शोधता येऊ शकते. रडारच्या मदतीशि लपून हल्ला करण्यात देखील याची मदत होणार आहे. अत्याधुनिक सामुग्री आणि तंत्रज्ञानामुळे मिग २९ चे आयुष्य वाढणार आहे. 


जानेवारी 2020 मध्ये, वायुसेनेने तंजावर एअर फोर्स स्टेशनवर सुपरसोनिक ब्रह्मोस-ए क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज एसयू -30 एमकेआयचे पहिले पथक तैनात केले. ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्रांना सोडणारे हे भारतीय हवाई दलाचे एकमेव लढाऊ विमान आहे. त्यामुळे सुखोई जेटचे महत्व आपल्यासाठी असल्याचे यावरुन लक्षात येते.