नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या हंगेरी,पोलंड, स्लोव्हाक आणि रोमेनिया या युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांच्या सीमेवर परराष्ट्र खात्याचे अधिकारी पोहचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


युक्रेनला लागून असणाऱ्या देशांच्या सीमावरुन भारतीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


युक्रेन युरोपियन युनियनचा भाग नाही, त्यामुळे व्हिसा संदर्भातील अडचणी येऊ नये म्हणून परराष्ट्र खात्यानं प्रत्येक सीमेवर विशेष अधिकाऱ्यांना नियुक्त केलं आहे.


त्यांचे फोननंबर प्रसारित करुन भारतीयांना ते ज्या देशाच्या सीमेजवळ असतील त्या सीमेवर पोहचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हल्ले सुरु झाल्यापासून युक्रेनची एअर स्पेस बंद आहे. त्यामुळे तिथे नागरी विमानं उतरु शकत नाहीयेत. 


काल युक्रेनमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी गेलेलं एअर इंडियाचं विमान परत आलं होतं. त्यामुळे आता भू मार्गाने भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.



---


परराष्ट्र खात्याची टीम 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनकडे रवाना झाली.  युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी, परराष्ट्र खात्याच्या टीम हंगेरी, पोलंड, स्लोव्हाक रिपब्लिक आणि रोमानियामधील युक्रेनच्या सीमेवर पाठवल्या जात आहेत.


परराष्ट्र खात्याच्या टीमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स :


हंगेरी:


युक्रेनच्या झाकरपट्टिया ओब्लास्टमधील उझहोरोडच्या समोर असलेल्या झाहोनी सीमा चौकीजवळ परराष्ट्र खात्याची टीम असेल.


i. Mr. S. Ramji,
Mobile: 36305199944
Whatsapp: 917395983990
ii. Mr. Ankur
Mobile & Whatsapp: 36308644597


iii. Mr. Mohit Nagpal,


Mobile: 36302286566


Whatsapp: 918950493059


पोलंड :


युक्रेनच्या क्राकोविक सीमेवर परराष्ट्र खात्याची टीम भारतीयांच्या मदतीसाठी तयार असेल.


i. Mr. Pankaj Garg
Mobile: 48660460814 / 48606700105


स्लोवॅक रिपब्लिक Slovak Republic:


Vysne Nemecke land border जवळ परराष्ट्र खात्याची टीम भारतीयांच्या मदतीसाठी तयार आहे.


i. Mr. Manoj Kumar
Mobile: 421908025212


ii. Ms. Ivan Kozinka


Mobile: 421908458724


रोमानिया : 


Suceava land border वर परराष्ट्र खात्याची टीम भारतीयांच्या मदतीसाठी तयार आहे.


i. Mr. Gaushul Ansari


Mobile: 40731347728
ii. Mr. Uddeshya Priyadarshi
Mobile: 40724382287


iii. Ms. Andra Harionov


Mobile: 40763528454
iv. Mr. Marius Sima
Mobile: 40722220823


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी या देशांच्या सीमेजवळ पोहचल्यास, परराष्ट्र खात्याची टीम त्यांच्या मदतीसाठी तयार असतील.