RVNL Multibagger Stocks: 27 मार्च 2020 रोजी अवघ्या 12 रुपयांना मिळणाऱ्या शेअर्सने त्याच्या गुंतवणूकदारांना 1000 पटीहून जास्त नफा मिळवून दिला आहे. आज त्या 12 रुपयांच्या शेअर्सची किंमत 159 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. होय. आपण रेल विकास निगम लिमिटेडच्या ​​शेअर्सबद्दल बोलत आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.65 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. त्यानंतर तो 7.40 रुपयांनी वाढून 138.45 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. आज सोमवार 4 सप्टेंबर रोजी तो 159.5 रुपये किंमतीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 11 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर गेल्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांना या शेअरमधून 12.29 टक्के परतावा मिळाला आहे.


गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी ₹ 66 च्या पातळीवरून ₹ 138 ची पातळी ओलांडली आहे. 


रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) ला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 256 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर आरव्हीएनएलच्या शेअरच्या किंमतीवर सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळाला. रेल विकास निगम कडून उन्नत मेट्रो स्टेशन, एक उन्नत स्थानक, इको पार्क आणि मेट्रो सिटी इत्यादी बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 


भारत सरकारने 2003 साली रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएलची स्थापना केली. ही एक नवरत्न कंपनी आहे. रेल विकास निगम लिमिटेड अनेक रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प तयार करत आहे. कंपनीच्या समभागांनी गेल्या 5 वर्षांत वार्षिक 20 टक्के दराने नफ्यात वाढ दिसून आली आहे. रेल विकास निगम लिमिटेडनेही गुंतवणूकदारांना 32 टक्के उत्कृष्ट लाभांश दिला आहे.


गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 320 टक्के मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी 3 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 550 टक्के बंपर परतावा दिला आहे. यामुळे आरव्हीएनएलमध्ये गुंतवणूक केलेल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवून चांगली कमाई करता येऊ शकते.