Prajwal Revanna sex scandal case :  कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देश हादरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवावरच सेक्स स्कँडलचा आरोप करण्यात आला आहे.  प्रज्वल रेवन्ना याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रेवन्ना यांच्या घरात काम करणा-या मोलकरणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप रेवन्ना यांच्यावर लावण्यात आला आहे. प्रज्वल रेवन्नाच तर त्यांचे वडील आणि देवेगौडा यांचे चिरंजीव आणि आमदार एच. डी. रेवण्णा यांच्यावरही लैंगिक शोषण केल्याचा आरोप करवण्यात आला आहे. 


हासन जिल्ह्यातील होलेनरासीपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे राज्यातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आहे असं कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी म्हटलंय. तर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिद्धरामय्या सरकारने सहाय्यक पोलिस महानिरीक्षक बी. के. सिंह. यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली आहे. महिलेच्यी तक्रारीनुसार पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354A, 354D, 506 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 
33 वर्षीय प्रज्वल या निवडणुकीत दुसऱ्यांदा हसन मतदारसंघातून जेडीएसचे उमेदवार आहेत. 


 


सूरतनंतर आता इंदूर लोकसभा मतदारसंघातही भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.. काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी अनपेक्षिपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय सुकर झाल्याची चर्चा आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बम यांनी काँग्रेसला तोंडघशी पाडली. दरम्यान, लवकरच ते भाजप प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून केलाय.