नवी दिल्ली: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दलाई लामा यांचा आशिर्वाद मिळाल्यानं खुप आनंद झाला असून आम्ही दोघांनी आनंद आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याबाबत चर्चा केल्याचं सचिननं सांगितलं. 


सचिन, दलाई लामा यांची होणार पूनर्भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमजवळ दलाई लामा राहतात. धरमशाला सोडण्यापूर्वी सचिन पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातय. सचिन पत्नी अंजली तेंडुलकरसमवेत धरमशालेमध्ये चार दिवसांच्या दौऱ्यावर असून इथं त्यानं युवा क्रिकेटर्सची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.


सोशल मीडियावर फोटो व्हायरल


सचिन तेंडुलकर आणि दलाई लामा यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.