हैदराबाद : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली काश्यप हे आज लग्नाच्या बेडीत अडकलेत. सायना आणि काश्यप यांनी आज साध्या पद्धतीने विवाह केला. त्यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. विवाहाची नोंदणी झाल्यानंतर सायनाने काश्यपसोबतचे खास फोटो ट्विटरवर शेअर केला. 'बेस्ट मॅच ऑफ माय लाइफ' असा उल्लेख तिने आपल्या ट्विटमध्ये केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायना- काश्यप यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला तरी १६ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी हैदराबादमध्ये रिसेप्शन सोहळाही होणार आहे.



सायना आणि पारुपल्ली यांची चांगली मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचे प्रेमसंबंध जाहीर करण्यात आले नव्हते. काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधाची जाहीर कबुलीही दिली होती. त्यानंतर ते आज विवाहबंधनात अडलेत.  


दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सायना नेहवालला खास शुभेच्छा दिल्यात. त्यांनी ट्विट करत दोघांचे अभिनंदन केलेत. सायनाजी ! आणखी एक चांगला सामना ... अभिनंदन