Salary Hike: पुढच्या वर्षी तुम्ही करताय शॉपिंग, ट्रॅव्हिंग प्लॅन; मग तुमचं स्वप्न होणार साकार
सर्वेक्षणानुसार जगात असे केवळ 37 टक्के देश आहेत ज्या देशात 2023 मध्ये महागाईला धक्का देणारी पगारवाढ होऊ शकते. त्या देशांच्या यादीत भारताचे नाव आघाडीवर असेल तसेच त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील देश मात्र मागे असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Salary Hike: जेव्हा आपल्या पगारात प्रचंड वाढ होते तेव्हा साहजिकच सर्वांनाच आनंद होतो. आता आपल्या देशातील नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक सर्वेक्षणानं (Survey) ही गुडन्यूज आपल्याला दिली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारतामध्ये इतर सर्व देशांच्या तुलनेत लक्षणीय पगारवाढ होऊ शकते. ईसीए इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार जगात असे केवळ 37 टक्के देश आहेत ज्या देशात 2023 मध्ये महागाईला धक्का देणारी पगारवाढ होऊ शकते. त्या देशांच्या यादीत भारताचे नाव आघाडीवर असेल तसेच त्याचवेळी अमेरिका (America), ब्रिटन आणि युरोपातील देश मात्र मागे असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (salary hike in india will be highest salary increase in 2023 compare to other countries)
कोणत्या देशांना वेतनकपातीचा धोका? या प्रकरणी पाकिस्तानला (Pakistan) मोठा झटका बसला आहे. सर्वेक्षणानुसार पगाराच्या बाबतीत पाकिस्तानची स्थिती भारताच्या अगदी विरुद्ध आहे. पाकिस्तानचे नाव सर्वात कमी पगारवाढ असलेल्या टॉप 5 देशांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पुढच्या वर्षी पाकिस्तानातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.9 टक्क्यांनी घट होऊ शकते, असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, घानामध्ये 11.9, तुर्कीमध्ये 14.4, श्रीलंकेत 20.5 टक्के आणि अर्जेंटिनामध्ये 26.1 टक्के वेतन कपात केली जाऊ शकते.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
कुठल्या देशात किती टक्के (Salary Hike in Percentage) पगारवाढ? या सर्वेक्षणात पगारवाढीच्या बाबतीत आशियातील 8 देशांची नावे देण्यात आली असून त्यात भारताचे नाव टॉप 10 मध्ये आहे. अहवालानुसार, यावर्षी भारतीय नोकरदारवर्गाला पगारात 4.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. ही केवळ आशियातीलच नव्हे तर जगभरातील सर्व देशांमध्ये सर्वाधिक राहील. दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम असेल. जिथे 4.0 टक्के पगारवाढ असेल. चीन तिसऱ्या क्रमांकावर असेल जिथे पगार 3.8 टक्क्यांनी वाढू शकतो. 3.4 टक्के पगारवाढीसह ब्राझील चौथ्या, सौदी अरेबिया पाचव्या (2.3 टक्के), मलेशिया सहाव्या क्रमांकावर असेल तेथे 2.2 टक्के पगारवाढ होऊ शकते. 2.2 टक्के पगारवाढीसह थायलंड सातव्या क्रमांकावर आहे, ओमान आठव्या क्रमांकावर आहे तेथे पगारात 2.0 टक्के वाढ होऊ शकते. रशियाचे नाव नवव्या क्रमांकावर आहे तेथे 1.9 टक्के आणि तैवानचे नाव दहाव्या क्रमांकावर आहे जिथे पगारात 1.8 टक्के वाढ होऊ शकते.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
सर्वक्षणाबद्दल थोडसं? वर्कफोर्स कन्सल्टन्सी फर्म (ECA) इंटरनॅशनलचे हे सर्वेक्षण 68 देश आणि शहरांमध्ये उपस्थित असलेल्या 360 बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे. या सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की 2023 मध्ये ब्रिटन आणि अमेरिकेत काम करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. युरोपीय देशांतील लोकांनाही पगाराचा मोठा फटका बसणार आहे. महागाईच्या उच्च पातळीमुळे तेथील पगार नकारात्मक असू शकतो.