नवी दिल्ली : संपूर्ण भारत देशालाच सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं धक्का बसला. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनाला या दुर्घटनेमुळं चटका बसला. देशातील तिन्ही सर्वोच्च दलांचे प्रमुख म्हणून बिपीन रावत सेवेत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 4 दशकांहून अधिक काळ त्यांनी देशसेवेत अर्पण केला होता. फक्त हीच जबाबदारी नव्हे, तर ते समाजाप्रती असणारं भान जपत काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडत होते. 
 
जनरल रावत यांचं पद आणि त्यांची जबाबदारी पाहता त्यांना नेमका किती पगार होता हा प्रश्नही विचारला गेला. इथं मुख्य बाब ही की, पगाराव्यतिरिक्त त्यांना इतरही सुविधा मिळत होत्या. 


शासकीय निवासस्थान, वाहनं, नोकरचाकर आणि इतर काही मंडळी त्यांच्या सेवेत होती. 


जनरल रावत यांच्या पगाराचा नेमका आकडा समोर आलेला नाही. पण, लेफ्टनंट रँकच्या सैन्यदल अधिकाऱ्याच्या पगाराची लेवल 10 असते. याचप्रमाणे जनरल रँकच्या अधिकाऱ्याच्या पगाराची लेवल 18 असते. 


CDS जनरल बिपीन रावत यांचे अखेरचे 'ते' शब्द, मी....  


 


18 म्हणजे सर्वात मोठी पे स्केल. याचाच अर्थ असा, की तिनही सैन्यदलांच्या प्रमुखांप्रमाणेच जनरल पदासाठीही 2.5 ते 3 लाख इतका पगार असतो. 


देशासाठी पगारातील काही भाग दान 
कोरोना काळात गरीब जनतेच्या गरजांसाठी काही निधी पीएम केअर फंड अंतर्गत गोळा केला गेला होता. जनरल रावत यांनी या निधीमध्ये योगदान दिलं. त्या क्षणापासून पुढे त्यांनी आपल्या पगारातून 50 हजार रुपये प्रती महिना गरजवंतांसाठी दान करण्याला प्राधान्य दिलं. 


जनरल रावत यांचं हे योगदान हे एकूण वेतनाच्या 20 टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. देशसेवेसोबतच गरजवंतांसाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल सर्वांचं मन जिंकत आहे.