जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा झाली आणि २ दिवस जेलमध्ये घालवल्यानंतर त्याला जामीन देखील मिळाला आहे. जोधपूर सत्र न्‍यायालयाने सलमान खानला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. कोर्टाला माहिती दिल्याशिवाय तो कोठेही बाहेर देशात जावू शकणार आहे. पुढची सुनावणी आता ७ मेला होणार आहे. सलमानला जोधपूर सत्र न्‍यायालयात हजेरी लावावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या या 'भाईजान'ची सुटका होताच त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. जेलमधून निघताच त्याला त्याचा फोन हवा आहे. त्यानंतर त्याला गॉगल हवा आहे. संध्याकाळी ६-७ पर्यंत सलमानची सूटका होऊ शकते. पण सलमान खान लगेचच मुंबईला नाही येणार आहे. सलमान खानच्या बॉडीगार्ड्चे तिकीटं उद्यासाठी बूक केली आहेत. आज रात्री सलमान त्याच्या बहिणींसोबत जोधपूरमधील विवांता हॉटेलमध्ये थांबेल. सलमान खानचं पर्सनल विमान जोधपूरलाच आहे. एटीसीकडून परवानगी मिळताच रविवारी सलमान जोधपूरहून मुंबईसाठी रवाना होईल.


सलमान खानच्या जामीन याचिकेवर सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली. या दरम्यान सलमान खानचे वकील महेश बोरा आणि हस्‍तीमल सारस्‍वत यांनी कोर्टात सांगितलं की, सलमान खान निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात फसवण्यात आलं आहे. सलमानला आर्म्‍स अॅक्‍टनुसार निर्दोष सुटका करण्याची मागणी देखील करण्यात आली. सलमान हा प्रत्येक सुनावणी दरम्यान हजर होता. त्याने जामिनाचा दुरुपयोग नाही केला असं देखील त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.