मुंबई : सोशल मीडियावर एक अतिशय प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नरेश नावाचा द्वियांग व्यक्ती सायकल चालवताना दिसत आहे. पण याची सायकल चालवण्याची पद्धत अतिशय हटके आहे. एका काठीच्या सहाय्याने तो सायकल चालवताना दिसत आहे. नरेश अतरौलीच्या लोधामधील नगला येथे राहणारा आहे. नरेश दररोज 34 किमी सायकल चालवून घर-ऑफिस असा प्रवास करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेश लॉक उत्पादन कंपनीत काम करतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोक दिव्यांग नरेशच्या हिम्मतीचं कौतुक करत आहेत. एक पाय नसतानाही, नरेश अतिशय सहज सायकल चालवत आहे.  पाय नसतानाही नरेशची सायकल हवेत बोलते. अपंग असूनही नरेश आपल्या पायावर उभा आहे आणि लोकांसाठी तो एका उदाहरणापेक्षा कमी नाही. जो कोणी नरेशला एका पायाने सायकल चालवताना पाहतो तो थक्क होतो.



नरेश काठीच्या साहाय्याने सायकल चालवतात आणि त्यांना रस्त्यावर सायकल चालवताना पाहून लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. अपघातात त्याला पाय गमवावा लागला. पण नरेशने हार मानली नाही आणि त्याच्या शारीरिक दुर्बलतेला त्याच्या धैर्याने पराभूत केले. त्याचे कारनामे पाहून लोकांना आश्चर्य वाटते.


लोकांना नरेशकडून प्रेरणा मिळते. एका पायाने अपंग असूनही नरेश कुटुंबावर ओझे नाही. नरेशमध्ये सामान्य माणसापेक्षा वेगाने सायकल चालवण्याची क्षमता आहे. दररोज नरेश घरातून सायकल चालवून कारखान्यापर्यंत पोहोचतो आणि नंतर कारखान्यातून घरी येतो. अपंग असूनही त्याने आयुष्यात निराशा होऊ दिली नाही. नरेशकडून प्रेरणा घेतली पाहिजे की आजच्या युगात लोक निराशेतून बाहेर पडून आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.