Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांना खूप खूप शुभेच्छा; आप खासदाराने केलेल्या ट्विटने वेधलं लक्ष
Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांचे गेल्या काही दिवसांपासून फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया देत ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत का असा सवाल केला होता. दरम्यान, राघव यांनी एका मुलाखतीत मला राजकारणावर प्रश्न विचारा परिणीतिवर नाही असं म्हटलं होतं.
Sanjeev Arora Wished Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिणीति चर्चेत असण्याचं कारण आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत दिसली होती. त्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच AAP खासदार संजीव अरोडा यांनी सोशल मीडयावर परिणीति आणि राघव यांचा फोटो शेअर केला. संजीव अरोडा यांनी हा फोटो शेअर केल्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत.
आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा (Sanjeev Arora) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की, 'मी परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांना खूप खूप शुभेच्छा. ते दोघं प्रेमाचं युनियन, आनंद आणि कम्पॅनियनशिपनं आनंदी रहा. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!'
दरम्यान, TOI नं दिलेल्यावृत्तानुसार, नुकतीच परिणीति आणि राघव यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या लग्नाची बोलणी सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या लग्नाच्या बोलणीनंतर लवकरच ते लग्नाच्या तारखेविषयी सांगणार आहेत. इतकंच काय तर त्या दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या नात्यानं काहीही तक्रार नाही असं म्हटलं जात आहे. ते त्यांच्या नात्याविषयी अधिकृतपणे घोषित करण्यासाठी एका चांगल्या दिवसाची प्रतिक्षा करत असल्याच्या देखील चर्चा सुरु आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत राघव यांनी पत्रकाराला म्हटले होते की तुम्ही मला राजकारणावर प्रश्न विचारा परिणीतिवर नाही.
हेही वाचा : Priyanka Chopra ने 'या' एका व्यक्तीमुळे सोडलं बॉलिवूड; कंगना रणौतचं धक्कादायक वक्तव्य
'भारत यूके आउटस्टॅंडिंग अचीवर्स ऑनर्स' मध्ये परिणीति आणि राघव नुकतेच भेटले होते. यावेळी परिणीति आणि राघव या दोघांना सन्मानीत करण्यात आलं होतं. राघव यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. 15 वर्षांपूर्वी परिणीतीनं ब्रिटनच्या मॅनचॅस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. परिणीती आणि राघव हे दोघेही त्यांच्या बॅचचे टॉपर होते. भारतात पहिल्यांदा कोणाला हा पुरस्कार मिळाला होता. हा सोहळा खरं तर भारतीय विद्यार्थ्यांचे यश लक्षात घेऊन त्यांचे यश साजरा करण्यासाठी करण्यात येतो.