नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँककडून PNB स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी pnbindia.in वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. पीएनबीच्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PNB SO Recruitment 2020 अर्ज भरण्यासाठी SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर इतर वर्गातील उमेदवारांना अर्ज करताना 850 रुपये फी भरावी लागणार आहे. 


पीएनबी बँकेच्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी वयोमर्यादा -


मॅनेजर पदासाठी 25 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. तर सिनिअर मॅनेजर पदासाठी 25 ते 37 वर्ष वयोमर्यादा आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.


मॅनेजर पदासाठी रिक्त जागा -


एकूण जागा - 535
मॅनेजर (Risk)- 160 पद संख्या
मॅनेजर (Credit)- 200 जागा
मॅनेजर (Treasury)- 30 जागा
मॅनेजर (Architect)- 25 जागा
मॅनेजर (Civil) - 2 जागा
मॅनेजर (Economic)- 10 जागा
मॅनेजर (HR)- 10 पदं


सिनिअर मॅनेजर पदासाठी रिक्त जागा -


सिनिअर मॅनेजर  (Risk) - 40 पद संख्या
सिनिअर मॅनेजर  (Credit)- 50 पदं


उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदांनुसार, वेग-वेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरुन अधिक माहिती घेऊ शकतात. निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.