बंगळुरू : भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेली AIADMK ची प्रमुख शशिकला नटराजन हिला बंगळुरूच्या तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचं समोर आलंय. कर्नाटकच्या तुरूंग उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी याबाबत अहवाल तयार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात शशिकलांसाठी वेगळ्या किचनपासून अनेक सोयी-सुविधा दिल्या गेल्याचं म्हटलंय. यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपये दिले गेल्याचीही चर्चा आहे. रूपा यांनी हा अहवाल तुरुंग महासंचालक एच.एस. सत्यनारायण राव यांच्याकडे सादर केलाय. राव यांनी मात्र शशिकलाला कोणतीही वेगळी वागणूक दिली जात नसल्याचा दावा केलाय. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.