नवी दिल्ली : ट्रेनमध्ये एका तरुणीची छेड काढणं काही तरुणांना चांगलंच महागात पडलं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक ट्विट केलं आणि रेल्वे पोलिसांनी धाव घेतली. विशाखापट्टनम येथून दिल्लीला जाणारी 22415 सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एक तरुणी भोपाळवरुन बसली. या दरम्यान ट्रेनच्या 3 एसी कोचमध्ये ५ ते ६ युवक चढले. ते नशेमध्ये होती अशी माहिती देखील मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी तरुणीची छेड काढली. या दरम्यान तरुणीच्या भावाने रेल्वेमंत्र्यांना ट्विट करत म्हटलं की, 'सर तुमच्या मदतीची गरज आहे. माझी बहिण ट्रेन नंबर 22415 मध्ये प्रवास करत आहे. तिच्या कोचमध्ये ६ लोकं ड्रिंक करुन चढले आहेत आणि तिची छेड काढत आहेत. मी रांचीमध्ये आहे आणि हेल्पलेस आहे. कृपया माझी मदत करा.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावाने केलेल्या या ट्विट नंतर लगेचच रेल्वेमंत्री कार्यालय हरकतीत आलं. या ट्विटनंतर रेल्वेमंत्री कार्यालयाने आग्रा एसपी जीआरपी पोलिसांना आदेश दिले. पोलिसांनी देखील युवकाला ट्विट करुन चिंता करु नका असं म्हटलं. तुमच्या मदतीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.



रेल्वे पोलिसांनी आग्रा स्थानकावर या युवकांना पकडलं. पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती ट्विट करुन दिली. रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या युवकांपैकी एक युवक 71 रेजिमेंट झांसी येथे तैनात आहे. त्याला पोलिसांनी लष्कर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.


या घटनेनंतर झी न्यूजच्या बातमीला टॅग करत रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं की, 'प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीन नेहमी सतर्क आहेत.'