नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकमध्ये (SBI) लिपीक संवर्गातील कनिष्ठ सहकारी पदासाठी  ८ हजार रिक्त पदांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार स्टेट बँकच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरुन लिंकच्या माध्यमातून SBI Clerck 2020 ऑनलाईन अर्ज करु शकतात. याशिवाय उमेदवार https://ibpsonline.ibps.in/sbijassdec19/ या लिंकवरुन थेट अर्ज करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकेच्या विविध शाखांमध्ये रिक्त असलेल्या ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट ऍन्ड सेल) रिक्त पदांसाठी SBI Clerk 2020 Notification २ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आलं आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. 


देशभरात जवळपास ८ हजार पदं उपलब्ध आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवार SBI Clerk 2020 साठी ३ जानेवारी २०२० पासून अर्ज भरण्यास सुरुवात करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० पर्यंत आहे.  UR / OBC / EWS उमेदवारांना २६ जानेवारी २०२० किंवा त्यापूर्वी ऑनलाईन माध्यमातून अर्जाची फी जमा करु शकतात.


अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - https://bank.sbi/documents/77530/400725/JA+20+-+Detailed+Ad+%28Eng%29++-+Final.pdf/7aeafcee-b7fd-b22d-8993-4eea4c969f7c?t=1577966465395


अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा -


ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - ३ जानेवारी २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जानेवारी २०२०
SBI Clerk प्रीलिम्स परिक्षा - फेब्रुवारी/ मार्च २०२०


वय मर्यादा -


२० ते २८ वर्ष


कसा कराल अर्ज -


उमेदवाराला बँकेची वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/ यावरुन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन फी भरावी लागेल. 


अर्ज करण्यासाठी फी -


UR / OBC / EWS – ७५० रुपये
SC / ST / PWD / XS – फी नाही