SBI Clerk Prelims Admit Card 2022 Download : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) लिपिक (Clerk) या पदासाठी अर्ज करण्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या इच्छुकांनी या पदासाठी अर्ज केला आहे. त्याचे  लिपिक प्रिलिम्स (SBI Clerk Prelims 2022) परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SBI लिपिक प्रवेशपत्र 25 नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. देशभरात लिपिक (ज्युनियर असोसिएट) प्रिलिम्स परीक्षा 12, 19 आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी  होणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी असेल परीक्षेची रुपरेखा?


SBI लिपिक ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेत 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. 3 विभागांचा या परीक्षेसाठी  1 तासाचा कालावधी देण्यात येणार आहे तर परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग देण्यात येतील.  (SBI Clerk admit card 2022 Exam Date, Call Letter Out for Prelims Exam nmp)


या थेट लिंकवरून SBI Clerk Admit Card डाउनलोड करा - SBI Clerk Prelims Admit Card Direct Link


असं करा SBI Clerk Prelims Admit Card डाउनलोड 


स्टेप्स 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in/careers वर जा.


स्टेप्स 2 : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या ज्युनियर असोसिएट्सच्या रिक्रूटमेंट जवळ दिलेल्या कॉल लेटरच्या लिंकवर क्लिक करा.


स्टेप्स 3: आता यात तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.


स्टेप्स 4: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.


स्टेप्स 5: आता ते तपासा आणि डाउनलोड करा.


स्टेप्स 6: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.


 


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लिपिक संवर्गात होणाऱ्या लिपिक भरतीद्वारे कनिष्ठ सहयोगी म्हणजेच लिपिकाची एकूण 5008 पदे भरली जातील. ऑनलाइन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे SBI लिपिक भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.


 


संघटना - स्टेट बँक ऑफ इंडिया


पोस्टचे नाव - लिपिक (कनिष्ठ सहकारी)


पद - 5 486


श्रेणी - सरकारी नोकऱ्या


अनुप्रयोग मोड - ऑनलाइन


परीक्षेच्या तारखा - 12, 19, 20 आणि 25 नोव्हेंबर 2022


परीक्षा मोड - ऑनलाइन


भरती प्रक्रिया - प्रिलिम्स- मुख्य


पगार रु. - 26,000 - रु. 29,000


अधिकृत संकेतस्थळ - http://sbi.co.in/


SBI लिपिक 2022: नियमित रिक्त जागा 


ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) रिक्त जागा


राज्य     इंग्रजी अनुसूचित जाती    एस.टी   ओबीसी  EWS GEN    एकूण
महाराष्ट्र मराठी  75     67      201   74       330         747