SBI-HDFC-ICICI Bank : गुंतवणुकीची (Investment) सवय किंवा मग पैशांच्या बचतीची (Saving) सवय असो, विविध बँकांनी आजवर आपल्याला आर्थिक बाबींमध्ये मोठी मदत केली आहे. घर घेण्यासाठीच्या कर्जापासून एखाद्या विमान योजनेपर्यंत बऱ्याच सुविधा या बँकांनी पुरवल्या आहेत. थोडक्यात आर्थिक गणितांच्या दृष्टीनं बँकांनी कायमच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. याच बँकांमध्ये अनेक नियम सातत्यानं बदलले जातात. काळानुरुप आणि बदलणाऱ्या आर्थिक धोरणांच्या धर्तीवर या नियमांची आखणी केली जाते. असाच एक नवा नियम काही सार्वजनिक आणि खासगी बँकांनी लागू केला आहे. ज्याचा खातेदारांवर थेट परिणाम होताना दिसेल. 


काय आहे हा नियम? (Bank Rules)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध बँकांमध्ये तुमचं सेविंग अकाऊंट अर्थाच बचत खातं आहे आणि हे खातं तुम्ही बंद करू इच्छित असाल, तर आता त्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. सहसा एकाहून अधिक खाती असल्यास या खात्यांचं व्यवस्थापन अतिशय कठीण होऊन जातं. ज्यामुळं खातं बंद करण्याचाच पर्याय खातेदार निवडतात. पण, आता इथंही पैसे आकारले जाणार आहेत. 'बँक अकाऊंट क्लोजिंग फी' अशा नावाखाली बँका ही रक्कम स्वीकारणार आहेत. त्यातही ठराविक कालावधीत खातं बंद केल्यासच ही रक्कम भरावी लागणार आहे.


कोणकोणत्या बँकांनी लागू केला हा नियम? 


HDFC Bank- एचडीएफसी बँकेत खातं सुरु केल्यानंतर 14 दिवसांच्या आत तुम्ही ते बंद करता तर तुम्हाला कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. पण, तुम्ही 15 व्या दिवसापासून 12 व्या महिन्यापर्यंक कधीही खातं बंद करणार असाल तर 500 रुपये क्लोजर चार्ज भरावा लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही रक्कम 300 रुपये आहे. 12 महिन्यांनंतर मात्र कोणतीही रक्कम आकारली जाणार नाही. 


ICICI Bank- आयसीआयसीआय बँकेमध्ये खातं सुरु केल्यानंतर 30 दिवसांच्या आत बंद केल्यास त्यावर कोणतीही रक्कम आकारली जात नाही. पण, 31 व्या दिवसापासून 12 महिन्यापर्यंत खातं बंद केल्यास त्यासाठी तुम्ही 500 रुपये रक्कम भरणं अपेक्षित आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : राज्याचा काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाची संततधार; पाहा कुठे जोर ओसरला 


 


SBI - स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये असणारं खातं तुम्ही बंद करत असाल तर, सुरुवातीलाच खातं बंद केल्यास कोणतीच रक्कम आकारली जात नाही. पण, 15 व्या दिवसापासून 12 व्या महिन्यापर्यंत कधीही खातं बंद केल्यास मात्र 500 रुपये आणि जीएसटी अशी रक्कम तुम्हाला भरावी लागते. 


Yes Bank - येस बँकेमध्ये असणारं खातं तुम्ही 30 व्या दिवशी किंवा एका वर्षानंतर बंद करत असाल तर, त्यावर बँक कोणीतीही रक्कम आकारत नाही. पण, 31 व्या दिवसापासून एका वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत खातं बंद केल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागतो. 


Canara Bank - पहिल्या 14 दिवसांमध्ये खातं बंद केल्यास बँक कोणत्याही प्रकारची रक्कम आकारत नाही. पण, 15 व्या दिवसापासून 12 व्या महिन्यापर्यंत खातं बंद केल्यास बँक तुमच्याकडून 200 रुपये आणि जीएसटीची रक्कम आकारते.