मुंबई : SBI Loan Offers: SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काही ऑफर देऊ केली आहे. त्यानुसार व्याज दर, कर्ज प्रक्रिया शुल्क माफ करणे आणि ठराविक कालावधीसाठी जास्त व्याज दर जाहीर केले आहेत.


एसबीआय ऑटो लोन ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ते आपल्या ऑटो लोन ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी आकारणार नाही, तसेच कार कर्जासाठी ऑन रोड 90 टक्के अर्थसहाय्य करेल. एवढेच नाही तर जे ग्राहक बँकेच्या YONO अॅपद्वारे कार कर्जासाठी अर्ज करतील, त्यांना व्याजदरांमध्ये 25 बेसिस पॉइंट (0.25%) ची विशेष सवलत देखील मिळेल. एसबीआयचे म्हणणे आहे की YONO वापरकर्त्यांना 7.5% व्याज दराने कार कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.


एसबीआय गोल्ड लोन ऑफर


याशिवाय, ज्या ग्राहकांना सुवर्ण कर्ज घ्यायचे आहे त्यांना 7.5% व्याज दराने 75 बेसिस पॉईंट्स (0.75%) सूट मिळेल. ग्राहकांनी YONO अॅपद्वारे सुवर्ण कर्जासाठी अर्ज केल्यास त्यांच्यासाठी प्रक्रिया शुल्क देखील माफ केले जाईल. एसबीआय आपल्या ग्राहकांना गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्काबाबतही दिलासा देत आहे. बँकेने जाहीर केले आहे की त्याच्या गृहकर्ज ग्राहकांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही, एसबीआयचे गृहकर्जाचे व्याज दर वार्षिक 6.7 टक्के पासून सुरु होतात.


वैयक्तिक कर्जावर सवलत


ऑटो लोन, होम लोन, गोल्ड लोन व्यतिरिक्त, जर ग्राहक पर्सनल (वैयक्तिक) लोन किंवा पेन्शन लोनसाठी अर्ज करु शकतो. यासाठीही प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार नाही. एसबीआयने फ्रंटलाइन हेल्थकेअर कामगारांसाठी एक विशेष ऑफर देखील आणली आहे. त्यांना वैयक्तिक कर्जावर 50 बेसिस पॉइंटपर्यंत सूट मिळू शकते. ही सवलत कार कर्ज आणि सोने कर्जासाठी लवकरच उपलब्ध होईल.


एसबीआय विशेष ठेव योजना


एसबीआयने 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट्स ही विशेष ठेव योजना देखील सुरु केली आहे. ही योजना मर्यादित काळासाठी आहे, जी 14 सप्टेंबर रोजी संपेल. या योजनेअंतर्गत ग्राहक 75 दिवस, 525 दिवस आणि 2250 दिवसांसाठी निश्चित पैसे मिळवू शकतो. तसेच, NRE आणि NRO मुदत ठेवींसह घरगुती किरकोळ मुदत ठेवी (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या अंतर्गत, नवीन आणि नूतनीकरण ठेवी देखील ठेवता येतील. याशिवाय, फक्त मुदत ठेव आणि विशेष मुदत ठेव ठेवता येणार आहे. NRE ठेवी फक्त 525 आणि 2250 दिवसांसाठी आहेत.


बँकेचे रिटेल आणि डिजिटल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक सीएस सेट्टी यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “आम्हाला विश्वास आहे की या ऑफर ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक बचत करण्यास मदत करतील आणि त्याचबरोबर त्यांच्या सणासुदीचा आनंदही वाढवतील.